Friday, August 1, 2025
घरमहाराष्ट्र१ मे महाराष्ट्र दिनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात तीव्र आंदोलन

१ मे महाराष्ट्र दिनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात तीव्र आंदोलन

प्रतिनिधी(प्रताप भणगे) : पिंपोडे बुद्रुक ता. कोरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरातील जिल्हा परिषद मालकीच्या गट नं. ४३0 मधील अतिक्रमण काढण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे १ मे ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात तीव्र आंदोलनाचा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन, महाराष्ट्र राज्य, सातारा जिल्हाध्यक्ष जावेद आत्तार यांनी दिला आहे.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की पिंपोडे बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात काही वर्षापूर्वी गट नंबर ४३0 मध्ये बांधलेल्या पंचवीस अनधिकृत गाळ्यांचे अतिक्रमण काढण्यात यावे म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन, महाराष्ट्र राज्य, सातारा जिल्हा अध्यक्ष जावेद आत्तार यांनी तक्रार दाखल केली होती.
यानंतर याप्रकरणी वेळोवेळी सुनावणी, चौकशी, मोजणी व पाहणी, अहवाल सादर करण्यात आला. भूमी अभिलेख कार्यालय, कोरेगाव यांच्या कडून संबंधित जागेची मोजणी करण्यात आली. मोजणी मध्ये सदरचे गाळे हे अतिक्रमण असल्याचे सिद्ध झाले.
ग्रामविकास अधिकारी, सरपंच, सदस्य व गटविकास अधिकारी हे या अतिक्रमण बाबतीत टाळाटाळ करत आहेत असे निदर्शनास आले. यामध्ये ठरल्या प्रमाणे राजकीय हस्तक्षेप सुध्दा झाला. ग्रामविकास अधिकारी यांनी तर गटविकास अधिकारी, कोरेगाव यांना लेखी कळविले आहे की अतिक्रमण काढण्यास मी असमर्थ आहे. यामुळे माझ्या जीवितास संबंधित गाळेधारक यांच्या कडून धोका निर्माण होऊ शकतो.
यानंतर सदरचे प्रकरण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे गेले. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी, कोरेगाव यांना संबंधित अतिक्रमण तात्काळ काढण्याचे व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वरती ग्रामपंचायत अधिनियम ३९ खाली अपात्रतेचा प्रस्ताव दाखल करण्याचे स्थायी आदेश पाठवले.
वरील सर्व घटनाक्रम पाहता व सर्व पुरावे देऊनही गटविकास अधिकारी, कोरेगाव यांच्या कडून आजपर्यंत अतिक्रमण काढण्याबाबतीत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच संबंधित सरपंच, सदस्य यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम ३९ नुसार अपात्रतेचा प्रस्ताव दाखल करण्यात आलेला नाही. यावरून गटविकास अधिकारी, सरपंच व सदस्य हे अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येते.
तरी सदरचे अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे व दप्तर दिरंगाई कायद्यानुसार विभागीय कारवाई करण्यात यावी. ग्रामपंचायत अधिनियम ३९ खाली सरपंच व सदस्य अपात्रतेचा प्रस्ताव पाठवण्यात यावा या प्रमुख मागण्या साठी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन, महाराष्ट्र राज्य, सातारा जिल्हा यांच्या वतीने १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांच्या दालनात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा जिल्हाध्यक्ष जावेद आत्तार यांनी दिला आहे. या आंदोलनाची सर्व जबाबदारी हि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची राहिल असेही त्यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments