प्रतिनिधी : पेहलगाम येथे हिंदूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या धारावी विधानसभा विभागातर्फे आज सायंकाळी सायन स्टेशनजवळील सागर हॉटेल येथे दहशतवादी यांचा पुतळा दहन व श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात महिला व पुरुष विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखा व उपशाखा अध्यक्ष, गट अध्यक्ष तसेच असंख्य मनसैनिक उपस्थित होते. देशभक्तीने भारलेला आणि रोष व्यक्त करणारा हा कार्यक्रम देशासाठी बलिदान झालेल्या वीरांना आदरांजली ठरला.