प्रतिनिधी : एका लहानशा गावात मेंढ्यांमागे धावत मोठा झालेला मुलगा आज पोलिस खात्याचा प्रतिष्ठित अधिकारी बनला आहे. बिरदेव ढोणे, मेंढपाळ कुटुंबातील एक साधा, पण जिद्दी मुलगा, त्याने आपल्या कष्टाने आणि चिकाटीने IPS अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.
बिरदेव यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील एक दूरच्या भागात आहे. लहानपणी शिक्षणाची फारशी सुविधा नसतानाही त्यांनी दिवसरात्र अभ्यास केला. गुरं राखताना पुस्तकं वाचणारा बिरदेव, वडिलांच्या कष्टांना व्यर्थ जाऊ न देता, प्रत्येक अपयशातून बळ मिळवत पुढे सरकत गेला.
“आमच्या भागात कुणालाच माहित नव्हतं की UPSC म्हणजे काय. पण मी ठरवलं होतं की काहीही झालं तरी मला ही परीक्षा पास करायची,” असं भावूक शब्दांत तो सांगतो.
बिरदेवने आपलं शिक्षण पुण्यात पूर्ण केलं आणि UPSC च्या तयारीसाठी दिल्ली गाठली. अनेक अडचणी, आर्थिक संकटं, अपयशं यांचा सामना करत त्याने अखेर यश मिळवलं आणि आज तो IPS अधिकारी म्हणून देशसेवेस सज्ज आहे.
धगधगती मुंबई तर्फे बिरदेव ढोणे यांना मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!