सांगली(विजया माने) : महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील प्रसिध्द कवी, लेखक, सामाजिक कार्यकर्ते हिंदरत्न दिपक लोंढे यांच्या साहित्यसेवा आणि समाजसेवाकार्याची दखल घेऊन,
टोकियो युनिव्हर्सिटी, जपान व भारत ह्युमन राईट फाऊंडेशन, भारत यांचे संयुक्त विद्यमाने आणि नॅशनल व्होकेशनल युनिव्हर्सिटी यांचे वतीने हिंदरत्न दिपक लोंढे यांना सर्वोच्च मानाची “मानद डॉक्टरेट पदवी” जाहीर करण्यात आली आहे.
हिंदरत्न दिपक लोंढे हे दिपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, सांगली. महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष असून, अनाथांची माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजसेविका पत्नी शारदा लोंढे यांचे सहकार्याने, मानव समाजातील दीन दुबळे, बेघर, निराधार वृद्धमायबाप यांची मनोभावे सेवा शुश्रूषा करण्याच्या मुख्य उद्देशाने, सांगली जिल्ह्यातील मिरज येथे हे दांपत्य “शारदा वृद्धसेवाश्रम” या नांवाने वृद्धाश्रम चालवतात.
शैक्षणिक, वैद्यकीय आणि आपत्कालीन मदतीसाठी नेहमीच धावून जाणारे लोंढे दांपत्य यांनी आपल्या समाजसेवाकार्याचा समाजापुढे एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. आजअखेर त्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. रविवार दि. ४ मे २०२५ रोजी नाशिक येथे सदर पदवी प्रदान सोहळ्यास उपस्थित नामवंत मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते अलौकिक अतुलनीय अशी “मानद डॉक्टरेट पदवी” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
गेली २३ वर्षे माझी सहचारिणी अनाथांची माई शारदा लोंढे हिच्या सहकार्याने मी केलेल्या पवित्र समाजसेवा कार्याची टोकियो युनिव्हर्सिटी, जपान आणि भारत ह्युमन राईट फाऊंडेशन, भारत यांनी दखल घेतली. खऱ्या अर्थाने आज आम्हां उभयतांच्या निस्वार्थ सेवाकार्याचे मोठे सार्थक झाले.
आपल्या मातृभूमितील सर्वच राष्ट्रसंत, राष्ट्रपुरुष, देशवासी, नातेवाईक, मित्रमंडळी, हितचिंतक व ज्यांची मी निस्वार्थपणे मनोभावे अहोरात्र सेवा शुश्रूषा करतोय अशा माझ्या सर्व निराधार, बेघर, अनाथ, वंचित व उपेक्षित वृद्ध मायबाप आणि लेकरांना मी माझ्या अंत:करणापासून धन्यवाद देतो. कारण ही अति महान पदवी मला आपल्या सर्वांची खंबीर साथ, पाठबळ, आधार, अनमोल मार्गदर्शन आणि शुभ आशीर्वादामुळेच मिळाली आहे.
संपूर्ण देशवासीयांच्यासह विशेषतः माझी जन्मदाती कष्टाळू आई श्रीमती भागीरथी लोंढे, खऱ्या अर्थाने मला जगणं शिकविणारी माझी आजी कै. गंगुबाई थोरात (अक्का) आणि जिने मला निस्वार्थ समाजसेवा शिकविली ती माझी सहचारिणी अर्थात अनाथांची माई शारदा लोंढे यांना ही “मानद डॉक्टरेट पदवी” समर्पित करत आहे. असे हिंदरत्न दिपक लोंढे यांनी आपले मत व्यक्त केले.
सांगलीचे प्रसिद्ध लेखक, सामाजिक कार्यकर्ते हिंदरत्न दिपक लोंढे यांना “मानद डॉक्टरेट पदवी” जाहीर..!
RELATED ARTICLES