Wednesday, June 25, 2025
घरमहाराष्ट्रगुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत कुटलवाडीतील कु.दुर्वा डावल हिचे सुयश; जिल्ह्यात प्रथम तर...

गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत कुटलवाडीतील कु.दुर्वा डावल हिचे सुयश; जिल्ह्यात प्रथम तर राज्यात सहाव्या क्रमांकाची ठरली मानकरी

कोकण – (दिपक कारकर) : विद्यार्थी हा ज्ञानसागरात पोहणारा राजहंस पक्षी आहे.शैक्षणिक प्रवाहात प्रत्येक विद्यार्थ्यांकडे विविध कलात्मक गुण दडलेले असतात. अशा विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन आणि संस्कार मिळाले की,सामाजिक पटलावर आपल्या कुशल नेतृत्वाने चमकताना दिसतात.असाच प्रत्येय ग्रामीण भागातील चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे कुटलवाडी गावातील जि.प.पूर्ण प्राथ.शाळा मुर्तवडे नं.५ ( कुटलवाडी ) ह्या शाळेची विद्यार्थीनी कु.दुर्वा संकेश डावल हिच्या अभ्यासात्मक यशातून दिसून आला आहे. गुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर ( रजि.) उपरोक्त संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षा ( GTS ) २०२४-२५ सदर परीक्षेत इयत्ता १ ली वर्गात शिकणाऱ्या दुर्वा डावल हिने सहभाग घेतला होता.जिल्हा – राज्यभरातून असंख्य विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.भाषा,इंग्रजी,गणित व परिसर अभ्यास आदी विषयांवर प्रश्नोत्तरे असणाऱ्या परीक्षेत दुर्वा हिने घवघवीत यश संपादन केले आहे.त्याच बरोबर शाळेचा इयत्ता १ ली मधील विद्यार्थी कु.श्रेयन सुनिल निर्मळ याने देखील सदर स्पर्धेत तालुक्यात तिसरा व राज्यात चौदावा क्रमांक प्राप्त केला आहे.दोन्ही विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.दिक्षा पवार मॅडम,सहाशिक्षिका सौ.निधी खामकर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.दुर्वा व श्रेयन यांचे शाळा व्यवस्थापन कमिटी व पंचक्रोशीतुन अभिनंदनासह कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments