विशेष प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील भोरचे माजी काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून, त्यांच्या शेकडो समर्थकांसह केलेल्या या प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थोपटे यांना “भाजपाचा कोहिनूर हिरा” असे गौरवले.राज्यातील भाजपाच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या भव्य कार्यक्रमात थोपटे यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थिती होती.थोपटे यांनी भाजपात प्रवेश करताना स्पष्ट केले की, “कोणत्याही पदासाठी नव्हे, तर जनतेच्या हितासाठी व मतदारसंघातील विकासासाठी मी भाजपा प्रवेश घेत आहे. काँग्रेस पक्षानेच माझ्यासमोर ही वेळ आणली.”त्यांच्यासोबत भोर, राजगड, मुळशी तालुक्यांतील अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही भाजपात प्रवेश केला. यात तालुका अध्यक्ष, युवक व महिला काँग्रेसचे पदाधिकारी, सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी यांचा समावेश होता.चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करताना सांगितले की, “राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची बदनामी करतात. काँग्रेसचे राजकारण चापलुसीवर चालते, तर भाजपाचे राजकारण विकासावर आधारित आहे.”संग्राम थोपटे यांच्या अनुभव, जनसंपर्क आणि नेतृत्वामुळे पुणे जिल्ह्यात भाजपाला अधिक मजबुती मिळेल असा विश्वास भाजपा नेत्यांनी व्यक्त केला.ही घटना केवळ पक्षबदलाची नसून, पुणे जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारी ठरू शकते.
संग्राम थोपटे यांचा भाजपात प्रवेश : पुणे जिल्ह्यात राजकीय भूकंप!
RELATED ARTICLES