मुबई : “मावळ मराठा” साप्ताहिकाच्या वर्धापनदिनानिमित्त (वर्ष २१वे) आयोजित विशेष कार्यक्रमात सुप्रसिद्ध चित्रकार, साहित्यिक व वृत्तपत्र सजावटीत क्रांती घडवणारे आर्ट डायरेक्टर श्री. प्रदीप म्हापसेकर यांना “मावळ मराठा पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारात सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र यांचा समावेश होता.
या कार्यक्रमात मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. संदीप चव्हाण, विश्वस्त राही भिडे, संपादक सदानंद खोपकर तसेच इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
मावळ मराठा चे संपादक आणि प्रदीप म्हापसेकर यांचे बरेच मित्रांनी या दोघांच्यावरही स्तुतीसुमने उधळली. २१ वर्षाचा खडतर प्रवास कसा पेलला असेल ते आजच्या पत्रकारितेपर्यंत अनेकांनी आपले अनुभव शेअर केले. श्री खोपकर यांनी आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल प्रास्ताविक भाषणात अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.म्हापसेकर यांचे सन्मान पत्र लिहिले आहे.त्यामध्ये त्यांचा सर्व खडतर प्रवास व्यक्त केला होता.
याच वेळी संपादक सदानंद खोपकर यांच्या पंचविसाव्या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. “एकावन्नी” या कवितासंग्रहात एकूण ५१ काव्यरचनांचा समावेश असून, रसिकांसाठी हा एक अनोखा साहित्यिक ठेवा आहे.
कार्यक्रम एक कौटुंबिक आणि साहित्यिक सोहळा ठरला, ज्यात सर्जनशीलतेचा, साहित्यप्रेमाचा आणि कलेच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.