Sunday, July 6, 2025
घरमहाराष्ट्रमा.श्री आनंदराव कोतुलकर यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न

मा.श्री आनंदराव कोतुलकर यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न

कराड : सह्यगिरी शिक्षण संस्था संचलीत न्यू इंग्लिश स्कूल आगाशिवनर ,मलकापूर येथील जेष्ठ शिक्षक मा.श्री आनंदराव कोतुलकर यांचा सपत्निक सेवानिवृत्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब दक्षिण मुंबईचे जॉंइट सेक्रेटरी मा.श्री नवनाथ पानस्कर व प्रमुख पाहुणे म्हणून श्री स्वामी विवेकानंद संस्थेचे माजी सहसचीव मा.श्री अशोक करांडे होते.
या प्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे अशोक करांडे म्हणाले, तीन वर्षापुर्वी प्रतिकूल परीस्थित सुरू झालेले हे विद्यालय अल्पावधीतच गरूडझेप घेते आहे हे अभिमानास्पद आहे.
अध्यक्षीय भाषणात मा.श्री नवनाथ पानस्कर म्हणाले,रोटरी क्लबच्या माध्यमातून मी शाळेला भरघोस मदत नक्किच करणार आहे.
कु.प्राजली सावंत,श्रीमती स्वाती काळे,मा.श्री मोहनराव पवार, माश्री रामचंद्र मोहिते,मा.श्री संदिप डाकवे,सौ.शब्दुली पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.सह्यगिरी शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव मा.श्री निजाम डांगे,मा.श्री बादशाहा डांगे,शिक्षण विस्तार अधिकारी,साताराचे मा.श्री संभाजीराव कानवटे,माजी निमंत्रक,सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे मा.आर .बी पाटील पंचवदन सामाजिक संस्था उंब्रजचे कायदेशीर सल्लागार मा.श्री गणेश लोहार पंचवदन संस्थेचे कराड तालुका अध्यक्ष मा.श्री रविंद्र लोहार मा.श्री अभय पाटील, मा.श्री सुरेशराव गरूड , मा.प्रा.उत्तमराव माने मा.श्री बापू सावंत,श्री शिवसमर्थ पतसंस्थेचे व्यवस्थापक मा.श्री संदिप डाकवे,कराड अर्बन बँकेचे संचालक मा.श्री श्रीरंग ज्ञानसागर,मा.श्री शशीकांत मत्रे.मा.श्रीमती शोभा देशपांडे ,मा.मा.श्री महादेव गरूड,माजी नगरसेवक मा.मोतीराम शेवाळे,मा.श्री कृष्णा सरगर,मा.श्री विजय कोतुलकर, मा.श्री निवास पवार,धनाजी बावडेकर,मा.श्री सुरेश कोतुलकर तसेच परीसरातील नागरिक ,सत्कारमुर्तीचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीसमर्थ मल्टीस्टेट को.क्रेडीट सोसायटीकडून मा.श्री अशोककुमार कांबळे यांनी डायस,व त्यावरील आधुनिक माईकसिस्टीम शाळेला भेट दिली.मा.श्री आनंदराव कोतुलकर यांनी शाळेची आर्थिक गरज ओळखून एक लाख रूपयांचा धनादेश दिला.या दातृत्ववानांच्या प्रती सह्यगिरी शिक्षण संस्थेचे सचिव मा.प्रल्हादराव साळुंखे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.मिनाक्षी सावंत यांनी केले.आभार मा.सागर जाधव व सुत्रसंचालन सौ.अनिता शेटे यांनी केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments