प्रतिनिधी : धारावी येथे आयुष मंत्रालय, भारत सरकार पुरस्कृत आयुष संचालनालय, महाराष्ट्र राज्य व केंद्रीय आयुर्वेदीय अनुसंधान संस्थान, सी. सी.आर.ए.एस., मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ४० वर्षांवरील महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर शुक्रवार १७ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात सामान्य स्वास्थ्य परीक्षण व वैद्यकीय सल्ला (तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांकरवी) या आरोग्य तपासणी करण्यात आली.
हिमोग्लोबिनसाठी रक्त तपासणी, रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी, रक्तदाब तपासणी, हाडांच्या ठिसूळपणासाठी तपासणी (USG), हाडांचा ठिसूळपणा, संधिवात, पाण्डुरोग (ऍनिमिया) इत्यादिसाठी आयुर्वेदिक औषधे (१-३ महिन्यांची औषधे) देण्यात आली.
सदर आरोग्य शिबिर धारावी कोळीवाडा, शास्त्रीनगर, साईबाबा मंदिर, होळी मैदान, धारावी येथे सामाजिक कार्यकर्ते संजय टिके, श्रीकांत तावरे, किरण आगवणे यांनी आयोजित केले होते.