प्रतिनिधी : मुंबई येथील जुहू चौपाटी परिसरातील रहिवासी आणि संपूर्ण भारतातील जागरूक नागरिकांनी प्रस्तावित बांद्रा-वर्सोवा कोस्टल लिंक प्रकल्पात उड्डाणपूल टाळून, पर्यावरणपूरक भूमिगत बोगद्याचा पर्याय स्वीकारावा, अशी जोरदार मागणी केली आहे. प्रसिद्ध नागरिक श्री. उम्मेद नहाटा, डॉ. हिमांशु मेहता आणि श्रीमती उषाबेन पटेल यांच्या पुढाकाराने दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेमुळे या मागणीला आता कायदेशीर बळ मिळाले आहे.
रहिवाशांनी सांगितले की प्रस्तावित उड्डाणपूल हा जुहू बीचच्या नैसर्गिक सौंदर्याला कायमचा डाग ठरेल. दररोज लाखो पर्यटक भेट देणाऱ्या या समुद्रकिनाऱ्याच्या दृश्यात अमूल्य हानी होईल, असा इशारा दिला गेला आहे.
“पूल नको, बोगदा हवा!” – टोकियो, बोस्टन, हाँगकाँगसारख्या शहरांनी बोगद्यांचा पर्याय निवडला आहे. समुद्रकिनाऱ्याचा अवकाश आणि पर्यावरण राखण्यासाठी भूमिगत मार्ग सर्वोत्तम, फक्त ७ किमी प्रकल्पासाठी बोगदा व्यवहार्य आहे; MMRDA नेही बोगद्याचा विचार केला होता.यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली मात्र पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने सुधारित दस्तऐवजांसह पुनर्रचित याचिका स्वीकारली आहे. त्यामुळे या आधीही मंजूर प्रकल्पांमध्येही बदल करून लोकहिताचे निर्णय घेतले गेले आहेत.
जनतेला आवाहन
“स्वर्ग वाचवा, खालून बांधा – पुलाला नाही, बोगद्याला हो!” जुहू बीचच्या संरक्षणासाठी आणि शाश्वत भविष्यासाठी, नागरिकांनी पुढे येऊन या मोहिमेला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.यासाठी काही घोष वाक्य बनवली आहेत.त्यापैकी काही घोष वाक्य
जुहू बीचला स्वर्ग ठेवा…. नरक नाही
पूल नको….बोगदा होवो