ध
ारावी : प्रज्ञा प्रतिष्ठान व प्रणाली सेवाभावी महिला असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये बुद्ध वंदना, लाडू वाटप, तसेच ‘बौद्धगया महाविहार कायदा १९४९ रद्द करावा’ या मागणीसाठी सह्यांची भव्य मोहीम राबविण्यात आली.
या कार्यक्रमाला आमदार डॉ. ज्योतीताई गायकवाड, धारावी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक राजू बिडकर, माजी आमदार बाबुराव माने, धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक राजू कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे धारावी तालुका अध्यक्ष उल्लेश गजाकोश, मनसेचे संदीप कदम व संदीप कवडे, जिगर मोरे, शिवसेनेचे विठ्ठल पवार, किरण काळे, आनंद भोसले,
धगधगती मुंबई चे संपादक भीमराव धुळप, तसेच संस्थेचे अध्यक्ष आयू.अनिल शिवराम कासारे, सरचिटणीस नितीन दिवेकर, कार्याध्यक्ष गौतमी जाधव, संजीवन जयस्वाल व विनीत कासारे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांचे विचार जनमानसात पोहोचवण्याचा संकल्प केला व बौद्ध समाजाच्या न्यायहक्कासाठी एकत्रितपणे लढण्याचे आवाहन करण्यात आले.