Monday, August 4, 2025
घरमहाराष्ट्रकन्याशाळा मलकापूरची शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची परंपरा कायम... एन.एम.एम. एस शिष्यवृत्तीत २ विद्यार्थिनी...

कन्याशाळा मलकापूरची शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची परंपरा कायम… एन.एम.एम. एस शिष्यवृत्तीत २ विद्यार्थिनी तर सारथी शिष्यवृत्तीत ११ विद्यार्थिनी शिष्यवृत्तीधारक…

कराड (विजया माने) : राष्ट्रीय आर्थिकदृष्टया दुर्बल घटक शिष्यवृत्ती( एन. एम. एम. एस) व छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा मलकापूरच्या विद्यार्थिनींनी बाजी मारत विद्यालयाची शिष्यवृत्तीतील यशाची परंपरा अखंड ठेवली. कु. अक्षरा कुंभार व कु. सिया यादव या दोन विद्यार्थिनी एन.एम. एम.एस शिष्यवृत्तीधारक झाल्या तर छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीत कु. श्रावणी रोकडे,कु.रिया भुजूगडे, कु. आदिती जाधव कु. तन्वी सावंत, कु.श्रावणी चाळके, कु. अंजली शिंदे,कु. आदिती पाटील कु.तन्वी पवार, कु. समीक्षा काळुगडे, कु. पलक घोरपडे,कु.ज्ञानेश्वरी चव्हाण या ११ विद्यार्थिनी शिष्यवृत्तीधारक झाल्या. आज अखेर विद्यालयाच्या ९२ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीधारक झाल्या असून या यशाने कन्याशाळा मलकापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.
सर्व यशस्वी विद्यार्थिनींना श्री. प्रकाश पाटील,सौ.करुणा शिर्के सौ.वनिता येडगे,श्री.जैनुद्दीन नदाफ, श्री.योगेश खराडे,सौ.सरीता रसाळ,सौ.पूजा वाघ,सौ.देशमाने मॅडम,श्री.मल्हारी शिरतोडे,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे, पर्यवेक्षक श्री. सुरेश राजे यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच संस्थेच्या मार्गदर्शक संचालिका डॉ.सौ. स्वाती थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार सुरू असलेल्या श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षेचाही या विद्यार्थिनींच्या यशात मोलाचा वाटा आहे.
यावेळी सर्व यशस्वी व उत्तीर्ण विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ, अध्यक्ष पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष भास्करराव पाटील, खजिनदार तुळशीराम शिर्के, मार्गदर्शक संचालिका डॉ.सौ.स्वाती थोरात,संचालक वसंतराव चव्हाण,प्रा. संजय थोरात, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे, पर्यवेक्षक सुरेश राजे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, हितचिंतक पालक सर्वांनी अभिनंदन केले.
यावेळी संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ यांनी विद्यार्थिनींच्या यशाचे कौतुक करीत कन्याशाळा मलकापूर मध्ये शिष्यवृत्ती, एन. एम.एम. एस,सारथी शिष्यवृत्ती,मंथन, स्पीड मॅथ्स, इंग्रजी बाह्य अशा विविध स्पर्धा परीक्षांच्या सातत्यपूर्ण सराव घेतला जात असून शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या त्रिवेणी संगमातून खऱ्या अर्थाने आज या विद्यालयाला यश मिळाले आहे व कन्याशाळेच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे असे मत यावेळी व्यक्त केले.
शिष्यवृत्तीतील सातत्यपूर्ण यशामुळे इयत्ता पाचवी ते दहावी नवीन प्रवेशासाठी कन्याशाळा मलकापूर पालकांच्या पसंतीत उतरत आहे.तेव्हा मलकापूर पंचक्रोशीतील पालकांनी शाळेचे संपर्क साधून आपल्या पाल्याचे उज्वल भवितव्यासाठी आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे यांनी केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments