Wednesday, June 25, 2025
घरमहाराष्ट्रअयुबच्या घणाघाती फटकेबाजीमुळे दुर्गापूर फ्रेंडसची उपांत्य़फेरीत धडक सुप्रिमो चषक क्रिकेट

अयुबच्या घणाघाती फटकेबाजीमुळे दुर्गापूर फ्रेंडसची उपांत्य़फेरीत धडक सुप्रिमो चषक क्रिकेट

मुंबई : सुप्रिमो चषक क्रिकेट स्पर्धेतील आजवरचा सर्वाधिक यशस्वी बॅटसमन म्हणून आपली छाप निर्माण करणाऱ्या अयुब शेखने आपल्या घणाघाती अर्धशतकी फटकेबाजीच्या जोरावर दुर्गापूर फ्रेंडस यूनियन क्लबला सुप्रिमोच्या उपांत्यफेरीत दिमाखात प्रवेश मिळवून दिला. दुर्गापूर फ्रेंडसने कंधारी किंगचा २६ रन्सने धुव्वा उडविला. अयुबने २८ चेंडूतील आपल्या खेळीत १ चौकर आणि ५ षटकार ठोकत नाबाद ६० रन्सची अफलातून खेळी केली. सुप्रिमो चषक क्रिकेट स्पर्धेतील त्याचे आजवरचे हे चौथे अर्धशतक ठरले. अयुबला मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने गौरविण्यात आले.
कंधारी किंग्सने उपांत्यपुर्व फेरीत नाणेफेक जिंकून दुर्गापूर फ्रेंडस यूनियन क्लबला बॅटींग दिली. अयुबच्या फटकेबाजीच्या जोरावर दुर्गापूरने ८ षटकांत ३ विकेटच्या मोबदल्यात ८७ रन्स केले. प्रत्युत्तरादाखल कंधारी किंग ८ षटकांत ८ विकेटच्या मोबदल्यात फक्त ६१ धावांपर्यंतच मजल मारू शकला. दुर्गापूरतर्फे सर्वोनिल रायने ११ रन्सच्या मोबदल्यात ३ विकेट घेतल्या.
दरम्यान, उपउपांत्यपुर्व फेरीत दुर्गापूर फ्रेंडस यूनियन क्लबने राजकोटच्या रार हॅरी संघाचा ५ विकेट राखून पराभव केला. जेनिश ठाकूरच्या २९ धावांच्या खेळीच्या जोरावर रार हॅरी संघाने ८ षटकात ७ विकेटच्या मोबदल्यात ६७ रन्स केले. दुर्गापूरतर्फे सातत्यपुर्ण कामगिरी करणाऱ्या सर्वोनिल रॉयन१४ रन्समध्ये ३ विकेट घेत मॅन ऑफ द मॅच चा कितबा पटकावला. दुर्गापूरने ६.४ षटकातचं ५ विकेटच्या मोबदल्यात ७३ रन्स करीत विजयी लक्ष्य पार केले. तर उपउपांत्यपुर्व फेरीच्या अन्य सामन्यात मुंबईच्या कंधारी किंग्ज संघाने सचिन ढवळे प्रहार इलेव्हन संघाचा ६ रन्सने पराभव केला. कंधारी संघाने सातव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या बबलू पाटीलच्या १३ चेंडूतील ३० धावांच्या फटकेबाजीच्या जोरावर ८ ओव्हरमध्ये ६ विकेटच्या मोबदल्यात ८० रन्स केले होते. बबलून स्पर्धेतील आपल्या १०० रन्सचा शतकी टप्पा आज पार केला. प्रत्युत्तरादाखल सचिन ढवळे प्रहार इलेव्हन संघ ८ षटकात २ बाद ७४ रन्सपर्यंतच मजल मारू शकला. कंधारी संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणारा बबलू पाटील मॅन ऑफ द मॅच किताबाचा मानकरी ठरला.
स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चित्र आता स्पष्ट झाल आहे. दुर्गापूर फ्रेंडस् युनियन क्लबसह पुण्याच्या डिगडाँग, मुंबईच्या बालाजी क्लब आणि कर्नाटकच्या एफ.एम. हॉस्पेट संघाने स्पर्धेची उपांत्यफेरीत धडक दिली आहे.
टेनिस क्रिकेटचा वर्ल्डकप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत श्रीलंकन क्रिकेटरसह कर्नाटक, कोलकाता, दिल्ली, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, राजकोट केरळसहीत देशातील अव्वल टेनिस क्रिकेटपटूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला १२ लाख रुपयांसहीत संघातील प्रत्येक खेळाडूला बाईक बक्षिसम्हणून देण्यात येणार आहे. विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडू लखपती होणार असल्याची माहिती आयोजक आमदार संजय पोतनिस यांनी दिली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments