Wednesday, June 25, 2025
घरमहाराष्ट्रमुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला नाना शंकरशेट मुंबई सेंट्रल असे नाव द्यावे ...

मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला नाना शंकरशेट मुंबई सेंट्रल असे नाव द्यावे अन्यथा…. ॲड.मनमोहन चोणकर रेल्वेखाली आत्महत्या करणार.

प्रतिनिधी : मी माझे सर्वस्व पणाला लावायची तयारी केली आहे. आता थांबणार नाही आणि जास्त काळ वाट पाहणार नाही.’…. सरकारला निर्वाणीचा इशारा देत चोणकर म्हणतात मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस असे नाव द्यावे म्हणून गेले तीस वर्ष संघर्ष चालू असताना केंद्र सरकार आमच्या मागणीकडे डोळेझाक करते आहे.
2020 साली महाराष्ट्र राज्य सरकारने नानांच्या नामकरणाचा प्रस्ताव बिनविरोध मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवला आहे परंतु अद्याप त्यावर निर्णय होत नाही. या गोष्टीचा खेद वाटतो.
थोर समाज सुधारक, भारतीय रेल्वेचे जनक, मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रलला द्यावे म्हणून येत्या 16 एप्रिल रोजी रेल्वे दिनानिमित्त सकाळी दहा वाजता मुंबई सेंट्रल येथे श्री. मनमोहन चोणकर यांच्या नेतृत्वाखाली नाना प्रेमींनी तीव्र निदर्शने करण्याचे ठरवले आहे. यास कुणी प्रतिकार केलाच तर ठिय्या आंदोलनही करण्यात येईल.
नाना शंकरशेट यांच्या नावाव्यतिरिक्त अन्य कुणाचे नाव देण्याचे केंद्र सरकारने निश्चित केले तर मी स्वतः रेल्वेखाली आत्महत्या करीन असा इशारा चोणकर यांनी पुन्हा दिला आहे. तरी केंद्र सरकारने त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. —- घनश्याम भडेकर

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments