भोसे : शक्ती ,भक्ती, कला ,चातुर्य आणि बुद्धिमत्ता यांनी श्रेष्ठ असलेल्या श्री हनुमानाचा जन्मोत्सव प्रातःकाली सूर्योदयाच्या वेळी काटवली येथे असलेल्या ” श्री हनुमान मंदिरात ” मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
गावातील भक्त सकाळी ५.३० वाजता श्री हनुमान मंदिरात एकत्र आले. श्री हनुमंताची षडोपचारे पूजा झाली मंदिरात भजन कीर्तन कार्यक्रम साजरे झाले. यावेळी महिलांनी पाळणा म्हणून जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सूर्योदयापूर्वीच हा श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी मंदिरात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. मंदिरात रात्री ह.भ प. ज्ञानेश्वरीताई पुजारी महाराज यांनी कीर्तन सादर केले. आजच्या युगात महिलांनी आपल्या मुलांना थोरांची चरित्रे वाचायला द्यावीत. छ्त्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, तुकाराम यांची माहिती सांगावी तरच भविष्यातील पिढी विचारवंत होणार असल्याचे यावेळी ज्ञानेश्वरीताई पुजारी यांनी सांगितले.
दरवर्षी काटवली येथे हनुमान जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा केला जातो. या कार्यक्रमाला भाविक भक्ताची तसेच महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
मूर्तीवर पुष्पवृष्टी…. सुंठवडा वाटप…
हनुमान मंदिरात सकाळी असंख्य भक्तानी हजेरी लावली होती. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान कीच्या गर्जनेने सारा आसमंत दुमदुमला. हनुमानाच्या मूर्तीवर सकाळी पुष्पवृष्टी करण्यात आली त्यांनंतर सुंठवडा वाटून जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
सोबत फोटो आहे
काटवली : सकाळी हनुमान मंदिरात महिलांनी पाळणा म्हंटला व जयंती साजरी केली. (रविकांत बेलोशे सकाळ छाया चित्र सेवा)