कराड प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील वांगव्हॅली पत्रकार संघाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवसंस्कार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा, पोवाडा-गीतगायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या सर्व स्पर्धांना संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फुर्त आणि उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या सर्व स्पर्धांचे निकाल जाहीर झाले असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. याप्रसंगी संघाचे उपाध्यक्ष नितीन बेलागडे, सचिव विजय सुतार, चंद्रकांत चव्हाण, संजय लोहार, तुषार देशमुख, पोपटराव झेंडे, हरीष पेंढारकर, अमोल चव्हाण, प्रमोद पाटील, पोपटराव माने, प्रदिप माने व अन्य उपस्थित होते.
स्पर्धेचे नांव आणि अनुक्रमे प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक पुढीलप्रमाणे : वेशभूषा स्पर्धा (लहान गट): हर्षवर्धन हिंमत जानुगडे, आयेशा नागेश मोरे, अथर्व कैलास मत्रे, वेशभूषा स्पर्धा (मोठा गट) : रेखा कसबे, विद्या म्हासुर्णेकर, चित्रकला स्पर्धा : ओम सुनील पवार, अमृता दत्ताजीराव कदम, वेदांत भरत कुंभार, पोवाडा-गीतगायन स्पर्धा : मुग्धा नितीन पोतदार, श्रेयस प्रकाश बोंगाळे, जि.प.शाळा गुढे, रांगोळी स्पर्धा : श्रावणी विजय लोहार, साक्षी शरद लोहार, वक्तृत्व स्पर्धा : शर्वरी संजय लोहार, मनस्वी प्रमोद पाटील, संस्कृती भिमराव भिंगारदेवे, निबंध स्पर्धा (लहान गट) : तन्मयी राजेंद्र पवार, राजमुद्रा गोरख नारकर आणि निबंध स्पर्धा (खुला गट) : विद्या म्हासुर्णेकर
विजेत्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील पुस्तक बक्षीस आणि सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिली जाणार आहेत.
वांगव्हॅली पत्रकार संघाने यापूर्वी गुणवंत विद्यार्थी सत्कार, वृक्षारोपण, कोरोना काळात आरोग्य सेवक-डाॅक्टर यांचा सन्मान, गणराया अवॉर्ड असे समाजोपयोगी उपक्रम राबवत आपल्या कामाची कर्तृत्वमुद्रा समाजमनावर उमटवली आहे. शिवसंस्कार महोत्सवामधील विजेत्या स्पर्धकांना लवकरच एका दिमाखदार सोहळयात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.
वांगव्हॅली पत्रकार संघाच्या शिव संस्कार महोत्सव स्पर्धेचे निकाल जाहीर
RELATED ARTICLES