महाबळेश्वर : मौजे रामेघर ता महाबळेश्वर येथे श्री हनुमान जयंती निमित्ताने जन्मोत्साचा सोहळा दरवर्षी ग्रामस्थ व नवतरुण विकास मंडळ मुंबई यांच्या वतीने २ दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, जेवणाची पंगत, जागरण, भजन, काकडा आरती, गावातून ग्रंथ दिंडी, काल्याचे कीर्तन असे आध्यात्मिक कार्यक्रम भक्तीपूर्ण वातावरणात पार पडले. या आध्यात्मिक कार्यक्रमाबरोबर ग्रामस्थ व मुंबई मंडळ यांच्या वतीने येरणे केंद्रातील २५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
या आध्यात्मिक व सामाजिक सोहळ्यासाठी ग्रामस्थांनी खूप मोठी मेहनत घेतली होती. ग्रामस्थांच्या बरोबर सोळशी विभागातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या जन्मोत्सवासाठी उपस्थिती होती.
या जन्मोत्सवाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रामेघर येथे हनुमान जन्मोत्सवात शैक्षणिक साहित्याचे वाटप
RELATED ARTICLES