धारावी – दख्खनचा राजा जोतिबा यात्रा चैत्र पौर्णिमेला भरते. ज्यांना कोल्हापूरच्या जोतिबाला जात येत नाही. यांच्यासाठी अनेक वर्षांपूर्वी धारावीत शिंदे परिवाराने ही जोतिबा पालखी परंपरा सुरू केली येथे जोतिबाचे देवाचे जुने मंदिर देखील आहे.येथे “जोतिबा पालखी आणि सासन काटी” १५० वर्षापासून ही परंपरा चालू आहे. “महाराष्ट्राचे दैवत जोतिबाच्या नावानं चांगभलं… असा जयघोष होत असतो. शनिवारी १२ एप्रिल रोजी,दुपारी ४ वाजता ” जोतिबा मंदिर, धारावी क्रॉस रोड ते काळा किल्ला” असा पालखीचा मार्ग असणार आहे. ज्या भाविकांनी नवस केलेला असतो तो पूर्ण झालेला नवस फेडण्यासाठी सर्व भाविक भक्तांना यावेळी “जोतिबा पालखी आणि सासन काटी”चे दर्शन घेण्यासाठी सर्वाना उपलब्ध होणार आहे. तरी भाविक भक्तांनी आवर्जून धारावीत ज्योतिबा पालखी व दर्शनाला यावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
धारावीत १२ एप्रिलला(शनिवारी) जोतिबा पालखी सोहळा
RELATED ARTICLES