प्रतिनिधी : रत्नागिरी ते नागपूर महामार्गासाठी शिरोळ तालुक्यात संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींना ४ पट मोबदला मिळावा,यासाठी सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर मुंबई येथे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केंद्राकडे सकारात्मक प्रस्ताव पाठवून शेतकऱ्यांना चौकट मोबदला मिळवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकरी वर्गात आनंद आणि समाधान व्यक्त होत आहे.
या महामार्गाच्या कामासाठी शिरोळ तालुक्यातील अंकली ते चोकाक या सुमारे ३३ किमी अंतरातील जमिनी संपादित केल्या जात होत्या.परंतु याच महामार्गासाठी इतर भागातील शेतकऱ्यांना जमिनीच्या चौपट दराने मोबदला मिळत असताना,शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना केवळ दुप्पट दर देण्यात येणार होता.यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते.एकाच रस्त्यासाठी वेगवेगळे मोबदल्याचे दर लागू केल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होणार होता,या पार्श्वभूमीवर काही गावांमध्ये शेतकऱ्यांनी उपोषणाचा मार्ग पत्करला.त्यांच्या या व्यथेला आवाज देत हा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळोवेळी मांडला.त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या समजावून सांगत,४ पट मोबदल्याची मागणी केली.मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विषयावर गंभीरतेने विचार करत तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते.
या आश्वासनानुसारच मंत्रालयात आज आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.या बैठकीत महामार्ग राज्य सरकारच्या वतीने केंद्राकडे सकारात्मक प्रस्ताव पाठवून शेतकऱ्यांना ४ पट मोबाईलला मिळवून देणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
“शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मी कायम लढा दिला आहे.शेतकऱ्यांच्या जमिनींना वेगवेगळे दर देण्याचा निर्णय अन्यायकारक होता. हा अन्याय दूर करून आता शेतकऱ्यांना ४ पट मोबदला मिळवून देण्यासाठी केंद्राकडे सकारात्मक प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय झालेले लवकरच शेतकऱ्यांना ४ पट मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ये बैठकीत खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे ( व्हिसीव्दारे) महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा
RELATED ARTICLES