मुंबई, ९ एप्रिल– भारतातील आघाडीचा स्थानिक भाषा प्लॅटफॉर्म व्हर्से इनोव्हेशन, सायनिंग हँड्स फाऊंडेशन आणि लुसिफर म्युझिक यांनी ‘दि राइट साइन’ या मोहिमेची घोषणा केली आहे. या उपक्रमाचा उद्देश भारतीय सांकेतिक भाषा (ISL) पॉप संस्कृतीत रुजवणे व कर्णबधिर समुदायास मुख्य प्रवाहात आणणे आहे.
या मोहिमेत रॅपर्स इंदीप बक्षी, एन्कोर, व्ही टाऊन क्रॉनिकल्स आणि YASH 1HUNID यांनी त्यांच्या लोकप्रिय गाण्यांचे नवीन व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये पारंपरिक टोळी चिन्हांऐवजी अर्थपूर्ण ISL चिन्हांचा समावेश केला आहे. तसेच ४० महत्वाच्या वाक्यांचे ट्यूटोरियलही प्रकाशित करण्यात आले आहे.
व्हर्सेचे CMO समीर व्होरा म्हणाले, “ही मोहीम फक्त एक उपक्रम नसून सांस्कृतिक परिवर्तनाचे साधन आहे.”
सायनिंग हँड्सचे संस्थापक अलोक केजरीवाल म्हणाले, “सांकेतिक भाषा ही संवादाच्या पलीकडील ओळख आहे.”
वंडरलॅबचे अमित अकली म्हणाले, “रॅपसारख्या प्रभावी माध्यमातून शिक्षण अधिक प्रभावी होते.”
तर लुसिफर म्युझिकने सांगितले की, “संगीत सर्वांसाठी असावे, ही आमची भावना या मोहिमेतून साकारली आहे.”
ही चळवळ सांकेतिक भाषेला स्वीकारण्याचे आणि समावेशाची नवी दिशा देणारी आहे.