सातारा : महाराष्ट्रात महायुतीला लाडक्या बहिणींनी सत्ता मिळवून देण्यासाठी मतदान केले. त्या बदल्यात भाऊबीज स्वीकारली असली तरी सातारा जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या पाटणमधील सासु सुनेला वारस हक्काच्या जागेसाठी संकलन दुरुस्ती व्हावी यासाठी उपोषण आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सासु सुनेच्या आंदोलनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पात्र असून देखील” संकलन रजिस्टर दुरूस्तीचा प्रस्ताव होत
नसल्यामुळे दि.०७ एप्रिल.२०२५ पासून मोरे कुटुंबीय सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करत आहेत.
या आंदोलनापूर्वी लेखी स्वरूपात संदर्भ
जा.क्र.पुनर्व/तारळी/कावि-११३६/२०२२, दि.३०.०१.२०२३ रोजीचे पत्र,
जा.क्र.पुनर्व/तारळी/कावि-६५७/२०२३, दि.१९.१०.२०२३ रोजीचे पत्र.,
आपले पुनर्व/तारळी/कावि-५०/२०२३, दि.१२.०२.२०२४ रोजीचे पत्र देण्यात आली आहे. परंतु गतिमान सरकारकडे हा प्रश्न सोडवण्यासाठी गती उरली नाही.
सातारचे पालकमंत्री श्री नामदार शंभूराज देसाई यांच्या मतदार संघातील श्री.के.एस.वाडकर, मंडळ अधिकारी, आवर्डे (तारळे)ता,पाटण, जि.सातारा यांना दि.०६. फेब्रुवारी.२०२४ रोजी लेखी निवेदन समक्ष हजर राहून दिले होते. सदर प्रकरण जवळ
जवळ वर्षभर श्री.वाडकर, मंडळ अधिकारी, आवर्डे यांनी स्वत:जवळ ठेवून घेतले व दि.१७. फेब्रुवारी.२०२५ रोजी तब्बल एक
वर्षानंतर चुकीचा अभिप्राय मा.तहसिलदार कार्यालय, पाटण यांना सादर केला आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदाराच्या
मागणीनूसार अर्जदाराला शासन निर्णयाप्रमाणे स्वतंत्र खातेदार म्हणुन लाभ देता येणार नाही. त्यांची नावे बाळकृष्ण मोरे
यांच्या खात्यात सामाविष्ट सामाईकात दाखल करणेस हरकत नाही. असे खाडाखोड करून स्वयंस्पष्ट अभिप्रायात नमुद केले आहे. परंतु, आंदोलनकर्त्या मोरे कुटुंबीयांनी सादर केलेल्या अर्जात स्वतंत्र खातेदार म्हणून लाभ मिळावा अशी कोणतीही मागणी केलेली नाही. असे निवेदनात नमूद केले आहे. जाणिवपूर्वक टाळाटाळ करून चूकीचा स्वयंस्पष्ट अभिप्राय सादर केला आहे.
श्रीमती लिलाबाई दत्ताराम मोरे तर्फे सून सौ.पूजा दिपक मोरे मौजे सावरघर (पूनर्व) काटेवाडी ता.पाटण,
जि.सातारा अशी सासू व सून सध्या आंदोलनाला बसलेले आहेत. या आंदोलनाला डॉक्टर प्रशांत पन्हाळकर श्री प्रमोद काटे सुहास सपकाळ ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके अशोक काटे यांनी पाठिंबा देऊन जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला आहे.
दिनांक ४ डिसेंबर १९८१ चे मूळखातेदार जोती लक्ष्मण मोरे यांचे नाव संकलन रजिस्टरला लावणे अपेक्षित होते, परंतु नजर चुकीने
त्यांचा थोरला मूलगा बाळकृष्ण जोती मोरे यांचे नावाने संकलन तयार झाले असून सध्या त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांचीच नावे लावण्यात आले आहेत. वारस हक्काने भावांची नावे न लावता थेट मुलांची नावे लावण्यात आली. असाही आरोप आंदोलकांनी केला आहे. सातारा जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात वारस नोंदीच्या नियमानुसार महसूल विभागाने कार्यवाही करावी यासाठी आंदोलनाची वेळ आली असल्याचे बोलले जात आहे.
___________________________________
फोटो– सातारा जिल्हा अधिकारी कार्यालयात वडील उपयोजित जमिनीची नोंद करण्यासाठी आंदोलनाची वेळ (छाया – अजित जगताप सातारा)