प्रतिनिधी(प्रताप भणगे) : सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व आपले मार्गदर्शक माननीय मानसिंगरावजी जगदाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वकर्मा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मसूर चे विद्यमान संचालक माननीय श्री. दिनकर शिरतोडे उर्फ अण्णा यांची सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी यांची निवड झाल्याबद्दल विश्वकर्मा पतसंस्थेच्या वतीने माननीय मानसिंगरावजी जगदाळे साहेब व माननीय दिनकर शिरतोडे अण्णा यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विश्वकर्मा पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन श्री. सचिन शिवाजी चव्हाण, व्हाईस चेअरमन श्री. चंद्रकांत उत्तम बर्गे, मसूरचे माजी लोकनियुक्त सरपंच व विश्वकर्मा संस्थेचे संचालक श्री. पंकज दीक्षित, मार्गदर्शक श्री नरेश माने आप्पा, मसूरचे माजी सरपंच श्री. प्रकाश माळी, मसूरचे माजी उपसरपंच श्री. विजयसिंह जगदाळे, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष श्री सिकंदर शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष श्री जमीर मुल्ला, विश्वकर्मा पतसंस्थेचे संचालक व संचालक श्री. नंदकिशोर दिक्षीत, संचालिका श्रीमती सुजाता शशिकांत जगदाळे, संचालिका श्रीमती धनश्री जयवंत बर्गे, पतसंस्थेचे कर्मचारी सारिका जाधव व सुनील गुरव यावेळी उपस्थित होते.
दिनकर शिरतोडे उर्फ अण्णा यांची सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी यांची निवडीबद्दल सत्कार
RELATED ARTICLES