Wednesday, August 27, 2025
घरमहाराष्ट्रसाताऱ्यात चक्री जुगार चालवते अनेकांचे आर्थिक चक्र...?

साताऱ्यात चक्री जुगार चालवते अनेकांचे आर्थिक चक्र…?

शाहूपुरी

(अजित जगताप ) : सातारा जिल्हा हा पुरोगामी व ऐतिहासिक जिल्हा अशी पूर्वी ओळख होते. आता बऱ्याच गोष्टी उजेडात येत असल्याने सातारकर म्हणून अनेकांना भावी पिढीची काळजी वाटत आहे. त्यातच चक्री जुगाराने अनेकांचे आर्थिक चक्र सुरू झाले आहे. यावर आता कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी ब्रेक लावण्याची गरज वाटू लागलेली आहे.
सातारा शहर व परिसरात वाढत्या नागरीवस्तीमुळे प्रत्येक ठिकाणी अनाधिकृत धंद्यामध्ये सरदार व सुभेदार निर्माण झालेले आहेत. आठ आमदार आणि साठ वाल्मिकी कराड अशी स्थिती सर्वत्र पाहण्यास मिळत आहे. याला कुणी अपवाद नाही.
राजकीय नेत्यांचे पाठ्यबळ नसले तरी भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्याचे कवच कुंडल लाभले. कारण आपल्या मर्जीतील अधिकारी आणण्यासाठी लोकप्रतिनिधी सक्षमरित्या काम करतात. त्याचेच फलित चक्रीच्या अड्ड्यात लपले आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये मागे वळून पाहिले तर तात्कालीन सातारा जिल्हाधिकारी एम रामास्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक के एम एम प्रसन्ना, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम देशपांडे यांचे आजही नाव काढले जाते. कायदा व सुव्यवस्था काय आहे? याचे चुणूक त्या सुवर्णकाळी सातारकर यांनी पाहिली आहे. आता मात्र सब घोडे.. बारा टक्के हेच दिवसाढवळ्या पाहण्यास मिळत आहे. गुन्हेगारांना सॉफ्ट कॉर्नर द्या असे सांगणारे सुद्धा निपाजले आहेत. हे उघड नागडं सत्य आहे.
सातारा जिल्ह्यातील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात खेड्यापाड्यातील सामान्य नागरिक तक्रारी घेऊन येतात. पोलीस अधीक्षक त्यांची भेट घेऊन संबंधित पोलीस ठाण्याला सूचना करतात. त्यानंतरच अनेक गुन्हे दाखल केले जातात. हे चक्र सुद्धा थांबणे गरजेचे आहे.
कर्तव्यदक्षता राखण्यामध्ये पोलीस अधिकारी सक्षम आहेत. पण स्थानिक पातळीवर घडणारे गुन्हे आणि त्यांना पाठीशी घालणारे आक्का यांची जास्त चलती काही पोलीस ठाण्यात सुरू आहे.
खबऱ्याचे पूर्वी जाळे असल्यामुळे अनेक गुन्हे घडण्यापूर्वीच अनेकांच्या
मुसक्या आवळल्या जात होत्या. आता खबऱ्याच्या जागी काही गबऱ्याने घेतली आहे. यामध्ये अनधिकृत धंद्यातील चढाओढ सुद्धा कारणीभूत आहे.
सातारा जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी व शहरातील सार्वजनिक ठिकाणी सोमवार पेठ ,राजवाडा, संगमनगर, मल्हार पेठ, वाडे फाटा, मोळाचा ओढा, बोगदा, करजे, शाहूपुरी, मंगळवार पेठ, शाहूनगर, सदर बाजार अशा अनेक ठिकाणी राजेरोसपणाने भाड्याने गाळे मिळत आहे. या गाळ्यातूनच चक्रीला सुरुवात होऊन अनेक जण अडकून पडलेले आहेत. यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाने आठवडाभर आंदोलन केले होते. शेवटी आंदोलन करण्यासाठी सुद्धा काही मर्यादा पडतात. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करावे म्हणून त्याचा फारसा गाजावाजा होऊ नये. याची काळजी घेतली जाते. हे दृष्टचक्र भेदण्यासाठी नैतिक अधिष्ठान असणे. याची शिकवण कुणीतरी दिली पाहिजे. प्रत्येक वेळी द्या मजा आणून एक तुतारी …. म्हणजे यांच्या हाती कायद्याची तुतारी दिल्याशिवाय कोणीही फुकणार नाही. अशी स्थिती आहे. याला समाज सुद्धा जबाबदार आहे.
चक्री जुगार, फटका अनाधिकृत दारू व्यवसायाशी निगडित राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि त्यांच्या बॅनरबाजी यावर आळा घालण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी. कारण लोकशाही उदंड झाली असून युगपुरुषांच्या प्रतिमे शेजारी ज्यांची फोटो लागतील. त्यांचे चारित्र्य पडताळणी घ्यावी अशी मागणी एका शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्याकडे साताऱ्यातील पत्रकारांनीच केली होती. याची यानिमित्त आठवण करून द्यावी वाटत आहे.
चक्री जुगारावर दोन-चार दिवसात कारवाई होईल पण त्या कागदोपत्री कारवाईपेक्षा चक्र थांबवणे. यासाठी लोकप्रतिनिधी सुद्धा युगपुरुषांच्या प्रतिभेसमोर हात जोडण्यापूर्वी शपथ घ्यावी अशी मागणी पुढे आले आहे.

__________________________
चौकट —- साताऱ्यात चक्री जुगारामुळे अनेकजणांना गुदमरत आहे. याची जाणीव आता सर्वांनाच झालेली आहे. हे परिवर्तनाचे चक्र थांबू नये अशी अपेक्षा आहे.
________________________
फोटो– सातारा शहरातील चक्री जुगाराचे कालचक्र

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments