मुंबई(प्रतिनिधी) : एका बाजूला विविध पक्षांतून नेते कार्यकर्ते यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्यात येत असल्याने पक्षातील निष्ठावंतांमध्ये असंतोष उफाळून येत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षातील निष्ठावंतांना सन्मानित करुन पक्षाला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते शाम कदम यांच्या सह अनेक निष्ठावंतांचा भाजप च्या ४५ व्या स्थापना दिना निमित्त अटल स्मृती उद्यान येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय सह संघटन मंत्री श्री. शिवप्रकाश आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री. पीयूष गोयल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी माजी खासदार श्री. गोपाळ शेट्टी व स्थानिक आमदार श्री. संजय उपाध्याय आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाने दिले ज्येष्ठ निष्ठावंतांकडे लक्ष ; स्थापना दिनाचे औचित्य साधून केले सन्मानित
RELATED ARTICLES