मुंबई(प्रतिनिधी) : कोणतीही चूक नसताना वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी केलेल्या मारहाणी विरुद्ध दात मागणारे वडाळ्यातील श्री.दत्तात्रय निमजे (82) हे ज्येष्ठ नागरिक गेल्या अनेक वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत निमजे यांना झालेल्या पच्छाताप बद्दल त्यांना 5 लाख रुपयांचे नुकसान भरपाई द्यावी तसेच भरपाईची रक्कम मिळेपर्यंत दरमहा साडेबारा टक्के दराने व्याज देण्याचे स्पष्ट आदेश राज्य मानव अधिकार आयोगाने गृह विभागाला दिले होते. मात्र गृह विभागाने त्यांना केवळ नुकसान भरपाईची रक्कम दिली आहे. व्याजाची रक्कम मिळवण्यासाठी संघर्ष सुरूच आहे. दत्तात्रय निमजे वडाळा भक्ती पार्क संकुलात राहतात. सोसायटीतील रहिवाशांकडून त्यांना शिवीगाळ झाली होती. त्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी ते पोलीस ठाण्याला गेले असता पोलिसांनी त्यांना राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाद मागितली मे 2018 मध्ये राज्य मानवी हक्क आयोगाने निमजे यांना व्याजासह नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. परंतु, गृह विभागाच्या सचिवांनी हे आदेश धुकावत नोव्हेंबर 2018 मध्ये निमजे यांना केवळ पंचवीस हजार रुपये दिले. निमजे यांनी हे पैसे परत करून फेब्रुवारी 2019 मध्ये सरकार विरुद्ध याचिका दाखल केली. त्यानंतर गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी त्यांना 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली. मात्र 2018 ते 19 मार्च 2019 या 36 महिन्याची व्याजाची सुमारे दोन लाख दहा हजारांची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. ही रक्कम मिळवण्यासाठी निमजे यांना शासन दरबारी फेरफटका मारावा लागत आहे. व्याजाची रक्कम मिळणे हा माझा हक्क आहे. माझ्यापासून वंचित ठेवण्यात आलेली मदत मला त्वरित देण्यात यावी तसे दोषीवर कारवाई व्हावी अशी निमजे यांनी मागणी केली आहे.
वडाळ्यातील ज्येष्ठ नागरिकाची शासन दरबारी फरफट सुरूच…. मानवी हक्क आयोगाच्या आदेशाला विभागाकडून वाटाण्याच्या अक्षता
RELATED ARTICLES