प्रतिनिधी :धारावीमध्ये रामनवमीचा सण यंदा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. वज्रदल तसेच भारतीय जनता पार्टी आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने धारावीतील मुख्य रस्त्यावर भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीस अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांनी सजलेल्या रस्त्यावर रामभक्तांनी एकत्र येऊन प्रभू श्रीरामाच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता.
धारावी विधानसभा येथे रामनवमीच्या निमित्ताने आज भव्य दिव्य अश्या रामनवमी शोभयात्रा च्या वेळी पाणी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला असताना राजेश सोनवणे,कौशिक कोळी, समीर भोईटे, संदिप कदम, नितीन दिवेकर, जिगर मोरे, तसेच सुरेखा भागत,भक्ती तिखे व सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थिती होते.