Tuesday, August 26, 2025
घरमहाराष्ट्रराज्यस्तरीय चित्र प्रदर्शन आणि पारितोषिक वितरण समारंभ ; आज पु. ल. देशपांडे...

राज्यस्तरीय चित्र प्रदर्शन आणि पारितोषिक वितरण समारंभ ; आज पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये रंगणार सोहळा

मुंबई(प्रतिनिधी) : आर्ट व्हिजन मुंबई यांचेमार्फत दरवर्षी चित्र प्रदर्शन भरविण्यात येते. याही वर्षी १३ वे वार्षिक समूह राज्यस्तरीय चित्र प्रदर्शन आणि बक्षीस वितरण समारंभाचे ७ एप्रिल रोजी सकाळी ११ ते ७ या वेळेत पु ल देशपांडे कला दालन रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजन करण्यात आले आहे.

या चित्रकला प्रदर्शनात महाराष्ट्रातून जास्तीत जास्त कला शिक्षक सहभागी होणार आहेत. ‘आर्ट व्हिजन’ मार्फत काही महिन्यांपूर्वी या सर्व कला शिक्षकांसाठी फलक लेखन स्पर्धा आयोजित केली होती आणि त्या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना बक्षीसे देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच राज्यस्तरीय गुनिजन कला पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच राज्यस्तरीय फलक लेखन पुरस्कार सुद्धा वितरित करण्यात येणार आहे.

या चित्र प्रदर्शन आणि पुरस्कार वितरण समारंभाला महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार ज. मो. अभ्यंकर, मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष अनिल बोरनारे, कला अध्यापक संघ मुंबईचे अध्यक्ष मीरा चाफेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या चित्रकला प्रदर्शन व बक्षीस वितरण समारंभाला महाराष्ट्रातील जास्तीत जास्त कला शिक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आर्ट व्हिजन मुंबईचे प्रमुख व विद्यामंदिर हायस्कूल विक्रोळी चे विद्यार्थीप्रिय व प्रयोगशील कलाशिक्षक मनोज सनान्से आणि त्यांचे सहकारीअर्जुन माचिवले, महेश कदम, रियाज काझी, आनंद मेहेर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments