सांगली : समाजावर येणाऱ्या कोरोना, महापूर सारख्या संकटावर शासनाच्या खांद्याला खांदा लावून मात करून संकटे उलटवून लावण्यासाठी सामाजिक संस्था, संघटनाचे कार्य अत्यंत मोलाचे ठरले आहे.त्यामुळे कै.मालतीदेवी विठ्ठल पेटारे मेमोरियल ट्रस्ट सारख्या सामाजिक संस्थांची आज समाजाला गरज असून ही संस्था आगामी काळात वंचितासाठी देवदूत ठरेल असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान सांगली चे संस्थापक अध्यक्ष श्री नितीन (दादा) चौगुले यांनी केले. ते सांगली येथील कै. मालतीदेवी विठ्ठल पेटारे मेमोरियल ट्रस्ट चे उदघाट्न समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, दिवंगत सौ. मालतीदेवी पेटारे(बाई)आणि दिवंगत श्री विठ्ठल पेटारे (गुरुजी) या उभयतांनी आपल्या शिक्षकी पेशाने एक आदर्श पिढी निर्माण केली. त्यांनी केवळ ज्ञानदानाचेच काम केले नाहीतर त्यांनी आपल्या परिवारातील मुले समजून त्याच्यावर चांगले संस्कार केले. त्यामुळे त्यांनी घडविलेली पिढी आज सर्वं क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत.त्यांच्या कार्याचा वसा यापुढेही चालू राहावा यासाठी पेटारे कुटुंबियांनी त्यांच्या नावे सुरु केलेला हा उपक्रम समाजाला दिलासा देणारा आणि मदतीचा हात देणारा असेल. असे सांगून समाजातील दानशूर मान्यवरांनीही या उपक्रमात सहभागी होऊन आपले योगदान द्यावे असे आवाहनही यावेळी श्री नितीन (दादा)चौगुले यांनी केले. यावेळी स्वा. सावरकर विद्यालयाचे सेवानिवृत्त आदर्श शिक्षक श्री मिलिंद सरोदे याचा सन्मानचिन्ह, मानपत्र व रोख रक्कम प्रदान करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी श्री मिलिंद सरोदे यांनी मिळालेली रक्कम संस्थेला परत करून संस्थेच्या उपक्रमासाठी उपयोगात आणावी असे सांगितले.यावेळी या संस्थेचे संस्थापक श्री राजेंद्र पेटारे यांनी सर्वांचे स्वागत करून या ट्रस्ट ची माहिती उपस्थितांना करून दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक या संस्थेच्या कार्याध्यक्षा डॉ. प्रा. ऐश्वर्या पेटारे यांनी केले. यावेळी प्रामुख्याने सांगली शहर राष्ट्रवादीचे आशुतोष धोतरे,यांच्यासह पेटारे कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन आदर्श शिक्षिका सौ. राजश्री पेटारे, इंजि. गौरीताई पेटारे, गीताताई पेटारे,शशिकांत पेटारे व आदींनी केले.शेवटी उपस्थितांचे आभार शिक्षिका सौ. सीमा सातपुते यांनी मानले.
कै.मालतीदेवी विठ्ठल पेटारे मेमोरियल ट्रस्ट वंचित घटकांना देवदूत ठरेल : श्री शिवप्रतिष्ठान अध्यक्ष श्री नितीन (दादा)चौगुले
RELATED ARTICLES