प्रतिनिधी : नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) श्री. भागवत डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने कोपरखेरणे विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभाग अंतर्गत श्री.प्रकाश आर यादव, एस.एस.टाईप, रूम नं 149, सेक्टर -7, कोपरखैरणे, नवी मुंबई. यांच्या बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये दिनांक 20-02-2025 रोजी नोटीस बजावण्यात आली होती. सदर बांधकामावर निष्कासनाची कार्यवाही करण्यात आली. कोपरखैरणे रेल्वेस्टेशन येथील सेक्टर-9, बालाजी सिनेमा समोरील फुटपाथवरील बेघर लोकांचे सामान जप्त करून डम्पिंग येथे जमा केले व कोपरखैरणे सेक्टर 1 येथील 2 झोपडपट्ट्या हटविण्यात आल्या. सदर अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते.
या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. वसंत मुंडावरे, कनिष्ठ अभियंता श्री.चंद्रकांत धोत्रे व इतर अधिकारी/कर्मचारी व न.मुं.म.पा पोलीस बंदोबस्त उपस्थित होते. तसेच सदर कारवाईसाठी 6 मजूर, 02 इलेक्ट्रॉनिक हॅमर, पिकअप व्हॅन 01, गॅस कटर 01 यांचा वापर करण्यात आला.
यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.