कराड ( प्रतिनिधी ) : सध्या सोशल माध्यमांवर ‘घिबली’ या ॲनिमेशन ट्रेंडची हवा सुरू आहे.एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कुटुंबासह स्वतःची छबी कार्टून मध्ये रूपांतरित केली जात आहे. युजरच्या घिबली इफेक्ट दिलेल्या फोटोंचा सोशल माध्यमातून महापूर आला आहे, मात्र यामुळे एआयमार्फत व्यक्तिगत फोटो व माहितीसह सर्व डेटा हॅक करून त्याचा दुरुपयोग होण्याचा धोका संभवतो . यासाठी सोशल माध्यम युजरसनी सतर्कता बाळगली पाहिजे असे मत तंत्रज्ञान तज्ञांकडून व्यक्त होत आहे .चॅट जीपीटी या एआय साधना मार्फत कोणतेही छायाचित्र घिबली शैलीत रूपांतरित होत आहे ,सध्या तरुणाईस सर्वच वयोगटातील सोशल वापर करते या ॲनिमेशन ट्रेंड च्या मोहात पडत आहेत.चॅट जीपीटी बरोबर ग्रीक ,जेमिनी आदी एआय साधनांचाही वापर होत असून कोण अधिक सुलभतेने छायाचित्रांचे रूपांतर करतो, याची जणु स्पर्धा सुरू झाली आहे ,अनेकांचे स्टेटस आणि प्रोफाइल फोटो हे कार्टून इफेक्ट मध्ये दिसत आहेत ,सध्या नवीन काहीतरी म्हणून त्याकडे आकर्षित होणे साहजिक असले तरी सोशल माध्यमांवर सक्रिय राहताना काही खबरदारी घेणेही आवश्यक आहे, घिबलीच्या माध्यमातून गेलेल्या फोटोंचे मॉफिंग करून दुरुपयोग तसेच ब्लॅकमेलिंग केले जाऊ शकते, व्यक्तीगत डेटा चोरीची संधी सायबर चोरांना मिळू शकते, त्यामुळे कार्टूनच्या सापळ्यात न अडकता सतर्कता बाळगण्याचे आवाहन सायबर तज्ञांनी व्यक्त केले आहे .
सोशल माध्यमातून ‘ घिबली ‘ ट्रेंडची ची हवा: काही क्षणांची मजा ठरू शकते भविष्यात मोठी सजा ..
RELATED ARTICLES