Friday, June 20, 2025
घरमहाराष्ट्रपालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडून कु.सांची डाकवेला शुभेच्छा

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडून कु.सांची डाकवेला शुभेच्छा

तळमावले/वार्ताहर : सातारा जिल्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी कु.सांची रेश्मा संदीप डाकवे या चिमुकलीला शुभेच्छा पत्र पाठवून वाढदिवसानिमित्त आशिर्वाद दिले आहेत. कु.सांचीचा तिसरा वाढदिवस शुक्रवार दि.4 एप्रिल, 2025 रोजी येत आहे. या अनोख्या शुभेच्छा पत्राने डाकवे परिवाराला सुखद धक्का बसला. या पत्रामुळे ते खुश झाले आहेत. सांचीच्या वाढदिवस व बोरन्हान समरंभानिमित्त राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक या पत्रात केले आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान ना.शंभूराज देसाई डाकेवाडी (काळगांव) येथे आले होते. त्यावेळी त्यांनी चिमुकल्या सांची डाकवेला कडेवर उचलून घेतले होते.
दरम्यान, सांचीच्या बारशानिमित्त विविध क्षेत्रातील 13 महिलांचा नारी रत्न पुरस्काराने सन्मान, बोरन्हाण समारंभाला महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक, पुस्तकांचं झाड, कॅलिग्राफीतून अक्षरसंस्कार इ.उपक्रम राबवले आहेत.
कु.सांचीच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त डाकेवाडीजवळील भैरीचे पाणी या कामासाठी अक्षरगणेशा उपक्रम, चि.स्पंदन डाकवे याच्या 10 व्या वाढदिवसानिमित्त आणि डाकेवाडी प्रीमियर लीग च्या पारितोषीकाची अशी मिळून रु.15,000/- देत खारीचा वाटा उचलला आहे.
सामाजिक जबाबदारीचे भान ओळखत डाॅ.संदीप डाकवे यांनी मुलांच्या वाढदिवसानिमित्त राबवलेले उपक्रम अभिनंदनीय आहेत.
या उपक्रमाला शिवसमर्थ परिवाराचे शिल्पकार ॲड.जनार्दन बोत्रे, बाळासाहेब कचरे, प्रा.ए.बी.कणसे, आई गयाबाई डाकवे, पत्नी सौ.रेश्मा डाकवे, भरत डाकवे, आप्पासोा निवडूंगे, शिवम असोसिएटसचे गुलाब जाधव तसेच स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभते. डाकवे परिवाराच्या सामाजिक उपक्रमाचे नेहमीच कौतुक होत असते.

*आपुलकी आणि मायेचे शुभेच्छा पत्र :*
सध्याच्या धकाधकीच्या आणि इंटरनेटच्या युगात पत्रलेखन कला दुर्मिळ होत आहे. हे पत्र भविष्यात सामाजिक कार्य करण्यासाठी ऊर्जा देईल. या आपुलकीच्या आणि मायेच्या पत्राबद्दल सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मनापासून आभार अशी भावनिक प्रतिक्रिया शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे आणि परिवाराने याप्रसंगी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments