Thursday, August 28, 2025
घरमहाराष्ट्रनवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मार्च महिन्यातील सेवानिवृत्तांचा सन्मान

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मार्च महिन्यातील सेवानिवृत्तांचा सन्मान

प्रतिनिधी :सेवानिवृत्ती हा आयुष्यातील फक्त एक टप्पा असून यानंतरच्या काळात कामाच्या व्यस्ततेमुळे करायच्या राहून गेलेल्या आपल्या मनातील गोष्टींना, कुटुंबियांना भरपूर वेळ द्या, वेळेचे आणि अर्थकारणाचे योग्य नियोजन करा आणि आनंदी आयुष्य जगा अशा शब्दात परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड यांनी मार्च महिन्यात सेवानिवृत्त होणा-या 5 अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांना शुभेच्छा दिल्या.

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झालेल्या या सेवानिवृत्ती सन्मान समारंभप्रसंगी उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड यांच्यासमवेत महापालिका सचिव श्रीम.चित्रा बाविस्कर, भांडार विभागाचे उपआयुक्त श्री.शंकर खाडे, विधी अधिकारी श्री.अभय जाधव आणि अधिकारी, कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचा-यांचे कुटूंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर यांनी जीवनाचे सार सांगणारी कविता सादर केली. तसेच श्री.शंकर खाडे आणि श्री.अभय जाधव यांनीही मनोगते व्यक्त करीत सेवानिवृत्तांना शुभेच्छा दिल्या.

नवी मुंबई महानगरपालिका सेवेतून मार्च महिन्यात निवृत्त होणारे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.संजीव पाटील, उप मुख्य स्वच्छता अधिकारी श्री.सतीश सनदी, शिक्षिका श्रीम.पुष्पा वाघमारे, आरोग्य पर्यवेक्षक श्री.पांडुरंग येमले व जोडारी श्री.दत्तात्रय दैवज्ञ या 5 अधिकारी, कर्मचारी व शिक्षक यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments