म
ुंबई (प्रतिनिधी) विविध शिबिरांच्या माध्यमातून परंपरा आणि आपली संस्कृती जपण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय विविध उपक्रम राबवित आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेवून लोककलेचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली लोककला जतन करावी. त्याचे संवर्धन करावे. असे मार्गदर्शन शनिवार (ता. 29) तमाशा प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांनी एका शानदार समारोप समारंभात केले.
.सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतीक कार्य संचालनालय यांच्या वतीने आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या सहकार्याने गेली दहा दिवस सुरू असलेल्या तमाशा प्रशिक्षण शिबीराचा समारोप समारंभ कलिना येथील मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या सांस्कृतिक भवनात पार पडला.सदर तमाशा प्रशिक्षण शिबीर यावेळी तमाशा सम्राट काळू बाळू कवलापूरकर यांना समर्पित करण्यात आले होते.
यावेळी माजी आमदार जेष्ठ कवी ,साहित्यिक लहू कानडे, चला हवा येऊ द्या “फेम”अभिनेते भारत गणेशपुरे ,मुंबई विद्यापीठाचे प्रा. डॉ. मंगेश बनसोड ,लावणी क्वीन चित्रपट अभिनेत्री मेघा घाटगे ,जेष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, खंडुराज गायकवाड, तमाशा सम्राट काळू बाळू यांचे नातू आनंद खाडे कवलापूरकर , वग सम्राट दादू इंदुरीकर यांचे पुतणे अशोक सरोदे( इंदुरीकर) व मुंबई परिसरातील कला रसिक ,आणि प्रेक्षक यांच्या उपस्थितीत शानदार सांगता समारंभ संपन्न झाला. या शिबीराचे संचालक प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी आपल्या प्रस्तावित भाषणात पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी तमाशा परंपरेनुसार गण, गवळण, रंगबाजी, पारंपारिक लावणी,म्हणनी याचे सादरीकरण करून उपस्थितीत मान्यवरांच्या टाळ्या मिळविल्या,हा कार्यक्रम बघून अभिनेते भारत गणेशपुरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना म्हणाले की, तमाशा प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी उदया हा कार्यक्रम घेवून व्यावसायिक रंगभूमीकडे वळली, तर हा शो हाऊस फुल्ल चालले, येवढे सुंदर पारंपारिक सादरीकरण विदयार्थ्यांनी केले.काळू बाळू यांच्या विनोदाचा संदर्भ देतांना ह्या जुन्या लोकांनी जे आमच्यासाठी पेरून ठेवले. आज त्यांच्यावर आमचं पोटपाणी सुरू आहे. असे ही यावेळी त्यांनी काढून आपल्या बालपणाच्या आठवणीला उजाळा दिला.
यावेळी लोककला अकादमीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.शिवाजी वाघमारे यांनी संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर यांची गाजलेली “हिरव्या रंगाच्या मांडीवरती”…. ह्या म्हणनी गायली. अन रसिकांनी टाळया वाजवून भरभरून दाद दिली.विशेषतः या म्हणनीला साथ देतांना नटरंग “फेम”कृष्णा मुसळे यांची ढोलकी कडाडली, अन उपस्थितीतानी चक्क माना डोलवायला सुरुवात केली.
यावेळी प्रशिक्षण शिबीरात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना माजी आमदार कवी साहित्यिक लहू कानडे, जेष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, लावणी क्वीन मेघा घाडगे, लोककलेचे अभ्यासक खंडूराज गायकवाड,मुंबई विद्यापीठाचे प्रा. डॉ. मंगेश बनसोड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. राष्ट्रीय भारूडकार डॉ. मोनिका ठक्कर यांनी ह्या समारोप सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.
भावी पिढीने लोककलेची परंपरा जपावी. मान्यवरांचे मार्गदर्शन…! अभिनेता भारत गणेशपुरे यांनी जुन्या कलावंताबद्दल केले ऋण व्यक्त..
RELATED ARTICLES