Sunday, June 22, 2025
घरमहाराष्ट्ररौप्य महोत्सवी पालखी सोहळा ! पदयात्रा : मुलुंड ते कार्ला

रौप्य महोत्सवी पालखी सोहळा ! पदयात्रा : मुलुंड ते कार्ला

मुंबई प्रतिनिधी : “आई एकविरा भक्त मंडळ मुलुंड ” या मंडळातर्फे रविवार दिनांक : ३० मार्च २०२५ रोजी ही पालखी मुलुंड (पूर्व) येथील गावांमध्ये फिरते व सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ ते शनिवार दिनांक : ५ एप्रिल २०२५ या कालावधीत ” मुलुंड ते श्री क्षेत्र कार्ला लोणावळा ” असे पदयात्रा पालखी सोहळ्याचे यंदाचे २५ वे वर्ष आहे.

सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ ला सायंकाळी ४ वाजता श्री तुंगवतेश्वर मंदिर – राजे संभाजी मैदान,मुलुंड (पुर्व) मुंबई येथून सदर पालखी सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे.

या सोहळ्यानिमित्त महाप्रसाद (भंडारा) मंगळवार दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी मुलुंड येथील तरुण उत्कर्ष मंडळाच्या मैदानात सांय : ७ ते १० या वेळेत होणार आहे.

या सोहळ्याच्या माध्यमातून कार्ला येथे समाजातील लोकांसाठी भक्त निवास उभारण्यासारखा चांगला उपक्रमही या मंडळातर्फे राबविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

यंदाचे वर्ष रौप्य महोत्सवी असल्यामुळे भाविकांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्याचे दिसून येत आहे असे “आई एकविरादेवी भक्त मंडळाचे
धडाडीचे अध्यक्ष श्री.कैलास रघुनाथ पाटील साहेब यांनी दिली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments