तापोळा – महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील सोळशी नदीच्या खोऱ्यातील येरणे केंद्र आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, विविध स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांना कौतुक करावे, शिक्षक पालक विद्यार्थी व समाज यांचा एकत्रित सुसंवाद हवा यासाठी बाल आनंद मेळाव्याचे नियोजन केले जाते. येरणे केंद्रामध्ये 12 प्राथमिक शाळा आहेत या सर्व शाळांचा एकत्रित बाल आनंद मेळावा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेगळी वरचीवाडी येथे अत्यंत उत्साहात व नियोजनबद्ध पद्धतीने संपन्न झाला
या बाल आनंद मेळाव्यासाठी महाबळेश्वर तालुक्याचे माजी सभापती श्री संजय गायकवाड गटशिक्षणाधिकारी श्री आनंद पळसे साहेब विस्तार अधिकारी श्री नामदेव धनावडे साहेब प्राथमिक आरोग्य केंद्र तापोळा चे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल कदम , केंद्रप्रमुख श्री आनंद संकपाळ श्री चंद्रकांत जंगम प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे संचालक श्री संजय संकपाळ श्री जयराज जाधव सर श्री अरुण कदम सर सरपंच शोभा संकपाळ माजी सरपंच रमेश संकपाळ, गणपत संकपाळ, वैशाली संकपाळ ग्रामपंचायत वेगळे चे आजी-माजी सदस्य ग्रामस्थ व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
विद्यार्थी भाषणे ,सांस्कृतिक कार्यक्रम , मनोरंजनात्मक खेळ ,आरोग्य विषयक व्याख्यान , स्नेहभोजन, खाऊवाटप अशा विविध उपक्रमांचा समावेश यामध्ये करण्यात आला होता
रामीण भागातील जिल्हा परिषदेतील मुले सर्वच क्षेत्रात आघाडी वर राहावी यासाठी सर्वतोपरे प्रयत्न करू असे प्रतिपादन माजी सभापती संजय गायकवाड यांनी केले तर शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी येरने केंद्रातील शिक्षक उत्तम काम करत असून तालुक्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी मोलाचे योगदान देत आहेत या बाबीचे विशेष कौतुक केले सुरेख रांगोळी नियोजनबद्ध कार्यक्रम तसेच बाल आनंद मेळावा उत्तम पद्धतीने पार पडावा यासाठी केलेले नियोजन याविषयी आवर्जून भाष्य केले.
केंद्रातील. सर्व शिक्षकांच्या उत्तम सहकार्याने हा बाल आनंद मेळावा विद्यार्थी पालक शिक्षक व समाज यांच्या सर्व घटकांसाठी आनंद देणारा दिवस ठरला
बाल आनंद मेळावा वेगळे येथे उत्साहात संपन्न
RELATED ARTICLES