Tuesday, June 24, 2025
घरमहाराष्ट्रगुढीपाडव्याच्या दिवशी मेगा ब्लॉक नको : माजी खा.राहुल शेवाळे यांची मागणी

गुढीपाडव्याच्या दिवशी मेगा ब्लॉक नको : माजी खा.राहुल शेवाळे यांची मागणी

प्रतिनिधी : हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात मोठ्या आनंदात साजरा केला जातो. आध्यात्मिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या या सणाच्या दिवशी भाविक मोठ्या संख्येने मंदिरामध्ये दर्शनासाठी प्रवास करतात. आप्तस्वकीयांच्या घरी जाऊन देखील हा सण साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर, गुढीपाडव्याचे अनन्यसाधारण लक्षात घेता, रविवार, 30 मार्च 2025 रोजी घोषित करण्यात आलेला मध्य आणि हार्बर रेल्वेवरील मेगा ब्लॉक पुढे ढकलावा किंवा रद्द करावा, अशी मागणी माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर यांच्याकडे केली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments