Wednesday, June 25, 2025
घरमहाराष्ट्रनवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 संवर्गातील 620 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू ;कोणत्याही अफवांवर...

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 संवर्गातील 620 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू ;कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन

प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर ‘गट-क’ आणि ‘गट – ड’ मध्ये 30 संवर्गात 620 पदांकरिता सरळसेवेव्दारे भरती प्रक्रिया सुरू झाली असून याबाबतची माहिती वर्तमानपत्रांतून तसेच महानगरपालिकेची वेबसाईट व सर्व सोशल मिडिया माध्यमांतून प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

तथापि मागील आठवड्यात महानगरपालिकेचे बोधचिन्ह असलेले खोटे लेटरहेड व खोटा शिक्का वापरून काहीजणांना नियुक्तीपत्र दिली असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस विभागाकडे रितसर तक्रार दाखल करून अशा प्रकारच्या दिशाभूल करणा-या माहितीला बळी पडू नये असे आवाहन वर्तमानपत्रांतून करण्यात आले होते.

मात्र आता नवी मुंबई महानगरपालिकेत 620 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू झाल्याची रितसर जाहीरात वर्तमानपत्रे व इतर माध्यमांतून प्रसिध्द झाल्यानंतरही काही व्यक्ती मागील आठवड्यातील सदर बातमीचा मजकूर सोशल माध्यमांव्दारे फिरवून ही भरती सुरू नसल्याची चुकीची माहिती प्रसारित करीत आहेत.

तरी याव्दारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात येत आहे की, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 संवर्गातील 620 पदांकरिता रितसर जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली असून अर्ज दाखल करण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली आहे.

तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी नवी मुंबई महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट https://www.nmmc.gov.in यावर तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम पेजला भेट द्यावी व याविषयीची अधिकृत माहिती जाणून घ्यावी व अर्ज करावेत असे आवाहन नमुंमपा प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments