Thursday, August 28, 2025
घरमहाराष्ट्रप्रदीप म्हापसेकर यांच्या 'मेरीगोल्ड' चित्र प्रदर्शनाची संपूर्ण मुंबईत चर्चा

प्रदीप म्हापसेकर यांच्या ‘मेरीगोल्ड’ चित्र प्रदर्शनाची संपूर्ण मुंबईत चर्चा

मुंबई(गजानन तुपे;कार्यकारी संपादक) : ख्यातनाम चित्रकार आणि व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर ह्यांच्या “मेरीगोल्ड” हे अमूर्त शैलीतील चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी च्या समोर आर्मी नेव्ही बिल्डिंग येथे भरले आहे. याचे उदघाटन लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांच्या हस्ते पार पडले. त्यांची अमूर्त शैलीतील विविध संकल्पनांमधील चित्रमालिका पाहण्यासाठी या ठिकाणी अनेक दर्दी लोक गर्दी करत आहेत. मुंबईच्या कलावर्तुळात मेरीगोल्ड चित्र प्रदर्शनाची जबरदस्त चर्चा सुरू आहे. काळाघोडा येथील आर्मी नेव्ही इमारतीच्या तळमजल्यावर हे प्रदर्शन सोमवारी ३१ तारखे पर्यंत सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे.
या प्रदर्शनाच्या उद्घाटन वेळी अभिनेते मिलिंद गवळी यांनी प्रदीप ह्यांचे याप्रसंगी कौतुक करताना त्यांच्या बहुतेक चित्रामध्ये दोन आकार असतात. जे प्रकृती किंवा जीवन घडविणार्‍या स्त्रोताचे प्रतीक म्हणता येईल. त्यांच्यासारख्या कलाकाराने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घ्यावी अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
उद्घाटनावेळी अष्टगंध प्रकाशन च्या संजय शिंदे यांनी प्रदीप हे चित्रकार, व्यंगचित्रकार आहेतच, शिवाय लेखक आणि कवी सुद्धा आहेत, त्यांच्या “चौथी सीट” ह्या पुस्तकाचे लवकरच प्रकाशन आपण करणार आहोत असं त्यांनी जाहीर केलं.
प्रदीप हे दिव्यांग मुलांसाठी कार्यशाळा घेत असतात हे विशेष आहे. सदर प्रदर्शनातील चित्र विक्रीला आहेत आणि काही लिलावा साठी. ह्यातून मिळणारे पैसे हे “सेव्ह आर्ट” ह्या संस्थेला आणि काही सेवाभावी संस्थांना दिले जाणार आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments