सातारा(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा नगरीमध्ये लोकशाही आहे. परंतु या लोकशाहीमध्ये आंदोलन केल्याशिवाय प्रशासन निर्णय घेत नाही. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सातारा नगरपालिकेच्या आवारातील पुतळा पूर्ववत सन्मानाने ठेवावा या मागणीसाठी तीन दिवस सामाजिक कार्यकर्त्यांना आंदोलन करावे लागले. आंदोलन गणेश वाघमारे यांची प्रकृती बिघडली त्यामुळे अखेर सातारा नगरपालिकेने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा सातारा नगरपालिकेच्या सभागृहात पूर्ववत ठेवला.
सातारा शाहू चौक येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्धा कृती पुतळा होता. परंतु सुशोभीकरण व पुतळ्याची नवीन उभारणी करण्यासाठी हा पुतळा काढण्यात आला. सातारा नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या चुकीच्या कृतीचा निषेध बाबत बेमुदत सामाजिक कार्यकर्ते व संविधान प्रचारक गणेश वाघमारे यानी याबाबत मंगळवार दिनांक २५ मार्च पासून बेमुदत आमरण उपोषण सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवस अन्न व पाणी काहीच न घेता हे बेमुदत आमरण उपोषण सुरू होते. त्यामुळे उपोषण करते यांची प्रकृती खालावली होती.
याबाबत प्रशासनाने गांभीर्याने दाखविले नाही तर सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता रोको करतील. त्यास सर्वस्वी सातारा जिल्हा अधकारी व नगरपालिका मुख्यधिकारी हेच जबाबदार राहतील. अशी सर्व संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते यानी जाहीर भूमिका घेतली. या सर्वच गोष्टींचा गांभीर्याने विचार करत निर्णय घेण्यात आला.
सदरचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा चार महिने पुतळा खाजगी व्यक्तीला देण्यात आला होता. संपूर्ण समाजाचा अवमान केला होता. सदरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्धा कृती पुतळा संबंधित खाजगी व्यक्तीकडून जमा करून घेत जुनी नगरपालिका सातारा येथील सभागृहात यथोचित सन्मान करत ठेवण्यात आला. याबाबतचे लेखी पत्र सातारा नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या कडून गणेश वाघमारे यांना देत अधिकारी यांच्या हस्ते नारळ पाणी पाजून उपोषण थांबविण्याची विनंती केली. यावेळी सातारा जिल्हाधिकारी यांनी सखोल चौकशी सुरू असल्याबाबत लेखी पत्र दिले. यावेळी आंदोलनात सहभागी झालेले वंचित बहुजन आघाडीचे गणेश भिसे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संजय गाडे, दलित पॅंथर चे अमर गायकवाड, उमेश चव्हाण, संदीप कांबळे, डोमेक्रॅटिक रिपब्लिकन पार्टीचे ऋषिकेश गायकवाड, वैभव गवळी, कामगार संघटनेचे किशोर धुमाळ, अरविंद गाडे, शशिकांत गंगावणे, नागेश सातपुते, अविनाश तुपे ,भाऊसाहेब सपकाळ, माजी नगराध्यक्ष विजय बडेकर ,चंद्रकांत दादा कांबळे ,लहुजी शक्ती सेनेचे सुनील भिसे, कुणबी मराठा संघटनेचे बिपिन निकम, अरबाज शेख, आरपीआयचे दादासाहेब ओव्हाळ ,दलित महासंघाचे विजय पवार, बहुजन युवक पॅंथरचे अंकित वाघमारे, महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या प्रतिभा शेलार, नंदा भिसे आदींसह नगरपालिका अधिकारी प्रशांत निकम, विश्वास गोसावी उपस्थित होते.
————————————————-
फोटो सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनाला पाठिंबा देताना मान्यवर (छाया- निनाद जगताप ,सातारा)