Tuesday, June 24, 2025
घरमहाराष्ट्रमुंबईत स्वतंत्र कोकण राज्य अभियानाची तिसरी बैठक संपन्न.

मुंबईत स्वतंत्र कोकण राज्य अभियानाची तिसरी बैठक संपन्न.

मुंबई(केतन खेडेकर) : कोकण राज्य या संदर्भात
सदर सभा लोअर परेल येथे संस्थापक श्री संजय कोकरे व श्री राजेंद्र खानविलकर, श्री पुनाजी गुरव यांच्या उपस्थितीत कुवेसकर यांच्या कार्यालयात घेण्यात आली.
यामध्ये स्वतंत्र कोकण राज्या विषयी विचार मांडण्यात आले. श्री राजेंद्र खानविलकर यांनी स्व.को.रा. संदर्भात बनविलेला लोगोला सामुहीकरित्या मान्यता देण्यात आली. स्वतंत्र कोकणावर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. कोकणातील जमिनीविषयक मते मांडण्यात आली. परप्रांतियांना
जी जमिन विक्री केली जाते. ती न विकता, भाडेतत्वा(लिज)वर दिल्यास हक्क राखून कोकणी माणसाला कसा फायदा होइल हे मांडण्यात आले. स्वतंत्र कोकण राज्य हे ७ जिल्ह्यांचे आहे. मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे आपल्या नकाशात असतील.
स्वतंत्र कोकण राज्याची घटना तयार करण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. *सदर घटना लिहीण्याकरिता प्रदीप मयेकर यांच्याकडे जबाबदारी देण्याचे मान्य करण्यात आले. सुहास चेउलकर आणि मुरलीधर करगुटकर यात त्यांना सहकार्य करतील तसेच श्री धनंजय विनायक कुवेसकर यांची स्वतंत्र कोकण राज्याचे मुंबई अध्यक्ष पदी निवड करण्यात आली* यामधये मुंबईतील सर्व चाकरमानी कोकणी बंधु आणि भगिणींना जास्तीत जास्त संख्येने अभियानात जोडून घेण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली.
आपल्या माध्यमातून मुंबई अध्यक्ष श्री धनंजय वि. कुवेसकर यांनी जाहीर आवाहन केले
“या संघटित व्हा, आपला कोकण वाचवा”. संपर्क:- व्हाटसअप 9869076602/ 9324763323

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments