Friday, June 20, 2025
घरमहाराष्ट्रमंत्री शिवेंद्रसिंह राजेंच्या वाढदिवसनिमित्ताने शैक्षणिक साहित्य वाटपाची तयारी

मंत्री शिवेंद्रसिंह राजेंच्या वाढदिवसनिमित्ताने शैक्षणिक साहित्य वाटपाची तयारी

सातारा(अजित जगताप) : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा रविवार दिनांक ३० मार्च रोजी वाढदिवस आहे. यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करून गोरगरिबांना आधार देण्याची भूमिका सातारा जावळी मतदारसंघातील सामान्य कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्याची सुरुवात मुनावळे येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांच्यापासून सुरू झालेले आहे. परंतु, काही ठेकेदारांनी स्वतःचेच शक्ती प्रदर्शन करण्याचा बेत आखला आहे. याची चर्चा रंगू लागलेली आहे.
सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी सर्वसामान्यांचे योगदान खूप मोठे आहे. वाड्या वस्ती पर्यंत विकास कामे पोहचवल्यामुळे सबकुछ मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले असा मतदार संघ आहे. सामान्य माणसांनी त्यांना मनमोकळेपणाने भेटावे असे वातावरण मंत्रालय व सुरुची बंगल्यावर दिसून येत आहे. थेट भेट नेहमीच घडत असल्यामुळे सामान्य माणसांची गर्दी व त्याची कामे होत आहेत. अशी सामान्य कार्यकर्ते वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करून मंत्री महोदयांनी केलेल्या कामाची दखल घेणार आहेत. त्यांच्या सर्वत्र मनापासून कौतुकच होणार आहे.
दुसऱ्या बाजूला वेगळ्या अर्थाने कमवण्यास शिकणाऱ्या योजनेपासून लाभ घेण्याचे लाभार्थी काही ठेकेदार आता छोटा वाल्मिकी म्हणून सातारा- जावळीत वावरत आहेत. त्यांची गोष्टच वेगळी आहे.
बीडचे नेते माजी मंत्री धनंजयराव मुंडे यांना अडचणीत आणणारे वाल्मिकी कराड यांची सातारा चर्चा होते. पण सातारा जावळीमध्ये असे छोटा वाल्मिकी अक्षरच्या प्रशासकीय अधिकारी व प्रामाणिकपणाने व्यवसाय करणाऱ्यांसाठी कमिशन एजंट म्हणून आपलं बस्तान बसवत आहेत. राजकारण, सहकार, शिक्षण , उद्योग व्यवसाय व चुकीला माफी नाही तर चुकीला पाठीशी घालणारी प्रवृत्ती वाढू लागलेली आहे. मंत्री महोदयांशी जवळीक असल्याचे सर्व दूर दिसावे म्हणून स्वतःची छबी प्रोजेक्ट करणारे हे छोटे वाल्मिकी झारीतील शुक्राचार्य ठरले आहेत. अशी आता टीका होऊ लागलेली आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गावोगावी बैठका घेऊन हार, बुके नको तर शालेय साहित्य घेऊन जाण्यामध्ये सामान्यांनी आघाडी घेतली आहे. असेच चित्र ३० मार्च रोजी दिसणार आहे. प्रामाणिकपणे व कष्टाने मिळवलेल्या पैशाच्या योगदानातून आपल्या नेत्याला दुवा- आशीर्वाद मिळावा. ही त्या पाठीमागे स्वच्छ भावना आहे. त्यांनी विधायक उपक्रमाच्या द्वारे व सामाजिक जाणीव ठेवून अनेक कार्यक्रमाची आखणी केली आहे.
इतर काही व्यावसायिक कार्यकर्ते आपली छबी आणि आपले राजकीय बस्तान बसवण्यातच धन्यता मानत आहे. नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांनी आपापल्या गावातील शाळा- अंगणवाडी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन विधेयक उपक्रम राबवल्यास खऱ्या अर्थाने नामदार शिवेंद्रराजे भोसले यांना आनंद वाटेल. अशी प्रतिक्रिया उमटत आहे. सध्या जाहिरातीचे युग असले तरी फक्त नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या कार्याचा गौरव करणारे लेख व त्यांच्या कामाची माहिती देणे अधिक चांगला आहे. अशा सामान्य कार्यकर्त्यांनी आपापल्या गावांमध्ये झालेल्या कामाची यादी व बाबांचा फोटो टाकल्यास त्याचे स्वागतच केले जाईल. असेही सामान्य कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. सदर वाढदिवसादिनी शालेय साहित्य ज्या कार्यकर्त्यांनी वाटप केलेले आहे अशांचा मंत्री महोदयांनी प्राधान्य सन्मान करावा व जे व्यावसायिक संबंध जपतील त्यांना निदान वाढदिवसा दिनी तरी बाजूला ठेवावे अशी अपेक्षा प्रामाणिक उद्दिष्ट कार्यकर्त्यांनी केली आहे.
———- ——— ——- ——- —– ——–
फोटो –

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments