Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रकु.वैष्णवी पाटील ला स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषीक जाहीर

कु.वैष्णवी पाटील ला स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषीक जाहीर

प्रतिनिधी :

पाटण तालुक्यातील काळगांव येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये इ.10 वीत मुलींमध्ये प्रथम आलेल्या वैष्णवी नितीन पाटील या विद्यार्थिनीस स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषीक जाहीर झाले असल्याची माहिती शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. यावेळी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष आप्पासोा निवडूंगे, सचिव सौ.रेश्मा डाकवे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
रोख रक्कम रु.1,000/-, सन्मानपत्र आणि तात्या पुस्तक असे याचे स्वरुप आहे. सांचीच्या वाढदिवसानिमित्त डाकवे परिवाराने हा उपक्रम राबवला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, डाकेवाडी (काळगांव) येथील चिमुकली सांची रेश्मा संदीप डाकवे हिच्या नावे ठेवपावती ठेवण्यात आली आहे. या ठेवपावतीच्या व्याजातून प्रतिवर्षी एका मुलीला स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषीक दिले जाते. यंदा हे पारितोषीक कु.वैष्णवी पाटील हिला जाहीर झाले आहे. वैष्णवी सध्या सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयात अकरावी विज्ञान या वर्गात शिक्षण घेत आहे. वैष्णवी ही काळगांवचे पोलीस पाटील नितीन पाटील यांची कन्या आहे.
या पारितोषिकाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक कांबळे ए.पी., जेष्ठ उपशिक्षिका सौ.जाधव एम.एस. गुरुकुल विभाग प्रमुख सौ.यादव एस.एस, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कु.वैष्णवीचे अभिनंदन केले आहे.
यापूर्वी सांचीच्या बारशानिमित्त विविध क्षेत्रातील 13 महिलांचा नारी रत्न पुरस्कार, बोरन्हाण समारंभाला ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ चा संदेश देत महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, कॅलिग्राफीतून अक्षरसंस्कार, पुस्तकांचे झाड इ.उपक्रम राबवले आहेत.
डाकवे परिवाराने शैक्षणिक चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी ज्ञानाची शिदोरी, माणुसकीच्या वहया, एक वही एक पेन, गणवेश वाटप, शाळेला तक्ते वितरण, विनामुल्य बोलक्या भिंती, महापुरुषांच्या प्रतिमांचे वितरण, गुणवंत विद्यार्थ्यांचा घरी जावून सत्कार, स्वाध्यायमाला वितरण, दिव्यांग मुलांना चित्रकला साहित्य वाटप असे उपक्रम राबवले आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments