प
्रतिनिधी : हायड्रोक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका प्रीमियम लीग २०२५ केटीपीएल पर्व चौथे २२ व २३ मार्च २०२५ रोजी आयोजित केलेल्या या क्रिकेट सामन्यामध्ये अनेक संघाने सहभाग घेतला होता. सलग दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये अंतिम सामना ‘जय महाराष्ट्र संघ’ येवती (संघमालक दीपक लोखंडे) तसेच त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी (संघमालक शंकर शेडगे,गणेश काटेकर) यांच्यामध्ये झाला. या सामन्यामध्ये विजेता ‘जय महाराष्ट्र’ संघ येवती ठरला. या संघाला रोख रक्कम १,११,१११/ तर उपविजेता ‘त्रिमूर्ती फायटर्स’ गोटेवाडी संघ ठरला. ७७,७७७/ रोख पारितोषिक तृतीय क्रमांक ‘श्री गणेश संघ’ गणेशवाडी (संघमालक रवी हिनुकले) ६६,६६६ तसेच चतुर्थ क्रमांक ‘शिवप्रेमी स्पो संघ’ साळशिरंबे (संघमालक मंगेश पाटील,आकाश पाटील) रोख पारितोषिक ५५,५५५ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शुभहस्ते देण्यात आले.यावेळी उद्योजक दीपक दादा लोखंडे अध्यक्ष सागर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या सामन्याला खासदार नरेश मस्के यांनी सुद्धा भेट दिली.