नवी मुंबई | नवी मुंबई वाशीतील कॉलेजमधील सुपरवायजर योगेश पाटील याने अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केला होता. इंग्रजीच्या विषयाची परीक्षा देत असताना, डेस्कवर तिच्याशेजारी बसुन तिच्याशी शारीरीक लगट करून, त्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर पाच ते सहा वेळा लैंगिक शोषण करण्यात आले. पीडित मुलीच्या पालकांनी मॉर्डन कॉलेजचा सुपरवायझर योगेश पाटील यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या परीक्षेचा हंगाम सुरु असल्याने सर्वच शाळा तसेच महाविद्यालयात विविध वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. अशातच वाशीतील मॉडर्न कॉलेजमध्ये अकरावी, कॉमर्स वर्गाचा इंग्लिशचा पेपर सुरू असताना वर्गावरील सुपरवायजर योगेश पाटील याने माझी अल्पवयीन विद्यार्थिनीच्या शेजारी बसून तिच्याशी शारिरीक लगट करून, त्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर पाच ते सहा वेळा लैंगिक शोषण केले. तसेच पेपर जमा करताना पीडित विद्यार्थिनीच्या हाताला स्पर्श करून तिचा लैंगिक छळ केला. ही घटना विद्यार्थिनीने आपल्या पालकांना सांगितल्यावर, पालकांनी कॉलेजचा सुपरवायझर योगेश पाटील याच्याविरोधात वाशी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.
