Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रश्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट, परेल तर्फे मुंबई मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट, परेल तर्फे मुंबई मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

पप्रतिनिधी: मुंबई मॅरेथॉनचे आयोजन श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट, परेल या संस्थेतर्फे करण्यात आले होते. यात जवळजवळ १६०० लोकांनी सहभाग घेतला. मॅरेथॉन मध्ये धावणाऱ्या स्पर्धकांना पद्मश्री उदय देशपांडे यांनी झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली. अडीच किलोमीटर आणि पाच किलोमीटर अशा दोन विभागात महिला आणि पुरुष यांना जवळजवळ ८० बक्षीसे देण्यात आली. सर्व स्पर्धकांना मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले व त्याचबरोबर संत गाडगे महाराज यांचे शिल्प कोरलेले एक पदकही देण्यात आले. या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक सामाजिक कार्यकर्ते संस्थेच्या संपर्कात आले. ८ वर्षाच्या लहान मुलांपासून ते ८७ वर्षाच्या आजी पर्यंत स्पर्धकांनी सहभाग घेतला. संस्थेचे प्रमुख विश्वस्त प्रा. हेमंत सुधाकर सामंत यांनी स्पर्धेचे नियोजन करणाऱ्या आयनमॅन घनश्याम उके आणि समन्वयक संदेश शेट्ये तसेच अनेक मॅरेथॉन यशस्वी रीत्या पूर्ण करणारे मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. विश्वास मोटे यांनी केलेल्या मार्गदर्शनाबाबत त्यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments