आष्टा(विजया माने) : २२ येथील कार्यरत असणाऱ्या बहुजन समता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन बहुजन समता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यालय उद्घाटन झाल्यानंतर आष्टा शहरात बहुजन समता पार्टी अाष्टा शहर कार्यकारणी सह शाखा क्रमांक १,२ व ३ च्या शाखेचे उद्घाटनही करण्यात आले. शाखा उद्घाटनानंतर अण्णाभाऊ साठे नगर समाज मंदिर येथे उद्घाटन प्रसंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बहुजन समता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाने आष्टा शहर वाळवा तालुका तसेच सांगली जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या मनात आनंद उत्साह निर्माण झाला असून या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषणामध्ये प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे साहेब म्हणाले की बहुजन समता पार्टी सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव प्रयत्नशील राहील. बहुजन समता पार्टी हा सर्वसामान्य लोकांच्या हिताचे कार्य करणारा पक्ष असून तो सर्वसामान्यांना न्याय देण्यात कुठेही कमी पडणार नाही, या जनसंपर्क कार्यालयामुळे गोरगरीब जनतेचे प्रश्न लवकरात लवकर सुटतील असे आश्वासन डॉक्टर मच्छिंद्र सकटे साहेबांनी दिले.
सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थित मान्यवर बहुजन समता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर विजय चांदणे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष दिनकर वायदंडे, सांगली जिल्हा अध्यक्ष बळीराम रणदिवे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विलास कांबळे, कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस आप्पासाहेब कांबळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कविता घस्ते, खानापूर तालुकाध्यक्ष अरुणा कांबळे, खानापूर तालुक्याचे संपत कांबळे, सुरेश सकटे, रितेश सचदेव, बाबासाहेब चव्हाण, नेताजी मस्के, संदीप घस्ते, बाबासो जाधव, प्रतिश चोपडे, वैभव अवघडे आशुतोष अवघडे, सचिन घाटगे, गोरखनाथ दणाणे, आदेश घस्ते, सुलतान सय्यद, सुरज सय्यद, अरबाज सय्यद, उस्मान सय्यद, असलम सय्यद आधी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व स्वागत बहुजन समता पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय दणाणे यांनी केले होते.
सर्व सामान्यांच्या न्याय हक्कासाठी बहुजन समता पार्टी सदैव प्रयत्नशील या : प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे
RELATED ARTICLES