– धगधगती मुंबईनवी मुंबई(ओमकार धुळप)– नवी मुंबई महानगरपालिकेच्या माझी वसुंधरा 5.0 उपक्रमांतर्गत कोपरखैरणे सेक्टर 14 येथील निसर्ग उद्यानात बीज गोळा प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्राची उभारणी माननीय आयुक्त कैलास शिंदे यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.सदर प्रशिक्षणासाठी उपायुक्त उद्यान श्रीमती नयना ससाने, सहाय्यक आयुक्त उद्यान श्रीमती ऋतुजा गवळी, तसेच सहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी श्री वसंत मुंडावरे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच कोपरखैरणे क्षेत्रीय अधिकारी श्री भालचंद्र गवळी, सहाय्यक उद्यान अधिकारी व उद्यान अधीक्षक श्री विजय कांबळे आणि उद्यान सहाय्यक श्रीकांत जाधव यांनी या उपक्रमासाठी मोलाचे योगदान दिले.बीज गोळा प्रशिक्षण केंद्रात “मोरया सांस्कृतिक कला व क्रीडा निकेतन” तसेच “कोपरखैरनेचा इच्छापूर्ती”—[गोड बाप्पा फुलांचा, संरक्षणाधीश पर्यावरणाचा] या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.या प्रशिक्षणादरम्यान बीज गोळा तयार करण्याच्या तंत्रज्ञानावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी बीज गोळ्यांचा उपयोग कसा करावा यावर माहिती देण्यात आली.कोपरखैरणे परिसरात हरित क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका आणि “माझी वसुंधरा 5.0” यांच्या पुढाकाराने जैवविविधता संवर्धनाच्या दिशेने ही महत्त्वाची पावले उचलली जात आहेत.धगधगती मुंबई | नवी मुंबई विशेष वार्ता
कोपरखैरणे सेक्टर 14 येथे बीज गोळा प्रशिक्षण केंद्राची स्थापना
RELATED ARTICLES