Tuesday, August 5, 2025
घरमहाराष्ट्रकोंडाई चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न; ह.भ.प. बाळ कृष्ण महाराज शिंदे,जयश्रीताई...

कोंडाई चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न; ह.भ.प. बाळ कृष्ण महाराज शिंदे,जयश्रीताई जाधव पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी(नितीन गायकवाड)

: सातारा जिल्ह्याच्या जावली तालुक्यातील तेटली गावात, कोंडाई चॅरिटेबल ट्रस्ट (रजि.) वतीने पुरस्कार सोहळा मोठ्या जल्लोषात आयोजित केला होता. समाजातील आदर्श व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणारा हा सोहळा कोंडाबाई देवजी भोसले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात समाजसेविका सौ. जयश्रीताई तुकाराम जाधव यांना कोंडाई सामाजिक महिला पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. तर सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. श्री बाळकृष्ण महाराज शिंदे यांना कोंडाई सामाजिक पुरुष पुरस्कार २०२५ दिला गेला. या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह,सन्मानपत्र, रोख पारितोषिक असे होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोयना सोळशी कांदाटी या विभागातील ३२ गावचे अध्यक्ष ह. भ. प. श्री धोंडीराम महाराज संकपाळ आणि सातारा प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक संजय संकपाळ गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावर्षी ट्रस्टने गरजू व्यक्तींना किट वाटप देखील केले. यावेळी महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाला कोयना, सोळशी, कांदाटी, सामाजिक विकास संस्थाचे पदाधिकारी सिताराम दादा जाधव उपाध्यक्ष, संदीप नलावडे सचिव, अण्णाबुवा शिंदे सावरी, विशाल शिंदे पाली, सचिन शेलार कोट्रोशी, सौ. नंदाताई शिंदे महिला संपर्क प्रमुख तसेच गणेश भोसले संचालक DMK जावली बँक, एकनाथ पाटील सरपंच केळघर (सोळंशी ) प्रकाश साळुंखे कोयना धरणग्रस्त संघटना अध्यक्ष, ॲड विश्वास साळूंखे, संजय शेठे मेढा, आणि पंचक्रोशी तील, गावातील जेष्ठ नागरिक, मान्यवर, विभागातील महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करून वातावरण प्रसन्न, आणि उत्साही करण्यात आले. या कार्यक्रमचे सूत्रसंचालन प्रताप भोसले, प्रकाश भोसले, प्रकाश को. भोसले यांनी केले. प्रास्ताविक डॉ. सौ. उज्वला जाधव यांनी केले. आभार आर. डी. भोसले संचालक, जावली, महाबळेश्वर बाजार समिती यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्ट चे संस्थापक किसन भोसले, मार्गदर्शक आर. डी. भोसले संचालक, जावली, महाबळेश्वर बाजार समिती. प्रकाश को. भोसले, प्रताप भोसले, प्रकाश ग. भोसले, प्रकाश सुतार, प्रशांत भोसले, वसंत भोसले, संतोष भोसले, भरत भोसले, संदेश भोसले, CA नितीन भोसले, श्रीमती नंदा भोसले, डॉ सौ उज्वला जाधव, सौ कविता सकपाळ, सौ विजया इंगवले तसेच

ग्रामस्थ मंडळ तेटली, जिजामाता महिला मंडळ तेटली, माऊली मंडळ मुंबई, श्री बाळसिद्धश्वर प्रतिष्ठान यांनी मेहनत घेतली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments