सातारा(अजित जगताप): महाराष्ट्राच्या महायुतीतील घटक पक्ष भारतीय जनता पक्षाचे माण खटावचे आमदार व राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या त्या महिलेची खंडणी प्रकरणी सातारा पोलिसांनी कारागृहात रवानगी केली आहे. दरम्यान, एक कोटी रुपये खंडणी मागणाऱ्या या सर्व प्रकरणाची एस.आय.टी मार्फत चौकशी करावी. अशी मागणी आता सुरू झालेले आहे.
सत्ताधारी पक्षातील आरोपींना पुराव्या अभावी जामीन मिळतो तर विरोधी पक्षातील आरोपीला पुरावा सिद्ध झाल्याने कोठडी मिळते. हे आता नवीन राहिलेले नाही. अशी खुलेआम चर्चा सुरू असतानाच आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात आठ वर्षांपूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांना त्यावेळी अटक ही झाली होती जामीन सुद्धा मिळाला होता. आणि निवडणुकीत विजयी सुद्धा ते झाले होते. त्यानंतर महायुतीच्या निवडणुकीत साताऱ्यामध्ये महायुतीला यश मिळाल्यानंतर आमदार गोरे यांच्यासह तीन आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ गेली. या सर्व प्रकरणांमध्ये त्या महिलेने पुन्हा एकदा जुन्या गुन्ह्याच्या आधारे आरोप केले. आणि आता त्याच महिलेला खंडणीप्रकरणी सातारा पोलिसांनी अटक केलेली आहे.
मुळातच या महिलेला खंडणी म्हणून देण्यात आलेले एक कोटी रुपये नेमके कुठून आले? एवढा मोठा दानशूर व्यक्ती कोण? हा मॅच फिक्सिंगचा प्रकार आहे का? याचीही माहिती मिळणे लोकशाहीसाठी उपयुक्त ठरणार आहे अशी प्रतिक्रिया उलटत आहे. दरम्यान, महिलेवर अन्याय झाल्यानंतर अनेक संघटना व माध्यम त्या महिलेच्या बाजूने उभे राहत होते .हे चांगली गोष्ट आहे. पण या प्रकरणांमध्ये सदर महिलेच्या खंडणीप्रकरणी झालेली अटक ही राष्ट्रीय बातमी म्हणून प्रसारित करण्याची जी घाई झालेली आहे. त्याबाबत न बोललेले बरे असे काही माध्यम तज्ञांनी स्पष्ट भूमिकेत सांगितले. दरम्यान, या प्रकरणी खंडणीमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार या शिवसैनिकाला दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघातील अनिल सुभेदार यांच्या चौकशीने शिवसेनेचे आणखीन कोण यामध्ये सामील आहेत? हे तपासात पुढे येईल का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. खंडणी पकरणी अटक होण्यापूर्वी त्याचे चित्रकरण व त्याचे प्रसारण ज्या वेगाने करण्यात आले. त्याबद्दल अनेकांना नवल वाटत आहे. अशी ग्रामीण भागात चर्चा सुरू झालेली आहे. दरम्यान, याबाबत अधिकृतरित्या माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.___________________________________
फोटो- खंडणी प्रकरणी साताऱ्यात अटक केलेली महिला व दहिवडी मध्ये आणि सुभेदार यांना ताब्यात घेताना
मंत्र्यांवर आरोप करणाऱ्या महिलेला एक कोटी खंडणी प्रकरणी साताऱ्यात अटक…
RELATED ARTICLES