Tuesday, August 5, 2025
घरमहाराष्ट्रदिपगंगा भागीरथी राज्यस्तरीय पुरस्कार २०२५ करिता विविध क्षेत्रांतून प्रस्ताव पाठविण्याचे अवाहन

दिपगंगा भागीरथी राज्यस्तरीय पुरस्कार २०२५ करिता विविध क्षेत्रांतून प्रस्ताव पाठविण्याचे अवाहन

सांगली(विजया माने) : दिपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य संचलित, शारदा वृद्धसेवाश्रम, सांगली आणि कोल्हापूर आयोजित.. दिपगंगा भागीरथी राज्यस्तरीय पुरस्कार- २०२५ (वर्ष ४ थे) या अंतर्गत महामहिम जीवन गौरव पुरस्कारसह मातापिता, भारतमाता रक्षक, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, औद्योगिक, वैद्यकीय,
प्रशासकीय, कला, क्रीडा, कृषी, संशोधन, न्याय / विधी, कष्टकरी कामगार आणि पत्रकारिता इ. १४ विविध क्षेत्रांतून
देण्यात येणारा आदर्श पालक (मातापिता), वीर जवान, समाजरत्न / समाजभूषण, शिक्षक गुरुरत्न, साहित्यरत्न / साहित्यसम्राट, उद्योगभूषण/ उद्योगरत्न धन्वंतरी, आदर्श प्रशासक, कलातपस्वी / कलारत्न, क्रीडारत्न / क्रीडाभूषण, कृषिभूषण / कृषीरत्न, संशोधकता, नीतीप्रज्ञ न्यायरक्षक, कामगारभूषण / कामगाररत्न आणि निर्भीड पत्रकारिता अश्या १४ विविध प्रकारच्या अत्युच्च मानाच्या अलौकिक पुरस्काराकरिता प्रति विभाग एक स्त्री आणि एक पुरुष पुरस्कारार्थी याप्रमाणे ३२ जणांची अत्यंत पारदर्शक पद्धतीने “दिपगंगा भागीरथी राज्यस्तरीय पुरस्कार २०२५” करिता निवड करण्यात येणार आहो. तेंव्हा आपण सेवाकार्य करत असलेल्या आपल्या क्षेत्रांतील पुरस्कारसाठी आपले प्रस्ताव पाठवावेत. असे अवाहन दिपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, कुपवाड, जि. सांगली या नोंदणीकृत राष्ट्रीय संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष तथा महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक, समाजसेवक हिंदरत्न दिपक लोंढे यांनी केले आहे.
सदर देय पुरस्कार संपूर्णपणे निःशुल्क आहे. पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मानाचा फेटा, पुष्पगुच्छ आणि पुस्तकं इत्यादी आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर येथे उच्च व अतिउच्च प्रशासकीय अधिकारी आणि सन्माननिय पाहुण्यांच्या उपस्थितीत, त्यांचे शुभ हस्ते करण्यात येणार असून, पुरस्कारासाठी निवड केलेल्या मान्यवर व्यक्तींनी स्वतः पुरस्कार स्वीकारण्यासाठी येणे बंधनकारक आहे.
तेंव्हा इच्छुकांनी आपआपल्या क्षेत्रातील आपली सविस्तर माहिती आपल्या फोटोसह तात्काळ खालील व्हाट्सअप नंबरवर थोडक्यात आणि सोबत दिलेल्या पत्त्यावर दि.५ मे २०२५ च्या आत पोहचतील अश्या प्रकारे स्पीड पोस्टाने किंवा कुरियरने पाठवावी. पोस्टाने किंवा कुरियरने पाठविलेले प्रस्ताव पुरस्कारासाठी विचारांत घेतले जाणार आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी संपर्क : हिंदरत्न दिपक लोंढे 86682 55503 व ईमेल- deepaklondhe696@gmail.com
आपला प्रस्ताव पाठविण्याचा पत्ता : शारदा वृद्धसेवाश्रम, सर्व्हे नं.१४६ / १ / बी १४६, चव्हाण प्लॉट, एकता कॉलनी, खोत नगर ३ री गल्ली पाठीमागे, मिरज मालगांव रोड मिरज, ता. मिरज, जि. सांगली. ४१६ ४१०
( संपर्क: 86682 55503 आणि 84320 21101)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments